CoronaVirus : उद्यानप्रेमींनो आता थोडे दिवस घरातच थांबावं लागणार...कारण

botanical garden.jpg
botanical garden.jpg

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाने 31 मार्चपर्यंत शैक्षणिक संस्थांसह गर्दीच्या ठिकाणी 144 कलम लागू केल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची मासिक महासभा रद्द करण्याचा निर्णय महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहीर केला. मंगळवार (ता.17)पासून शहरातील सर्व उद्याने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशी नागरिकांची माहिती महापालिकेला कळविण्याचे आवाहन केले आहे. 

466 उद्याने मंगळवारपासून पुढील सूचना येईपर्यंत बंद

महासभा मंगळवारी होणार होती. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 144 हा जमावबंदीचा कायदा लागू केल्याने महापौरांनी दक्षतेचा भाग म्हणून महासभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर शहरातील 466 उद्याने मंगळवारपासून पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्याचे आदेशित करण्यात आले. शहर स्वच्छतेसाठी जादा कर्मचारी लावण्याबरोबरच मास्क व सॅनिटायझर पुरविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. अमुल्या क्‍लिनअपसारख्या संस्थांची स्वच्छतेसाठी नियुक्ती करता येईल का, याबाबतही चाचपणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची व्यवस्था केली जाणार असून, नागरिकांनी महापालिकेसंदर्भातील काम महापालिकेच्या ऍपद्वारे करण्याचे आवाहन केले. 

दीपालीनगरच्या व्यक्तीची तपासणी
 
प्रभाग 23 मधील दीपालीनगरमध्ये दुबईहून एक नागरिक पाहुणा म्हणून आल्याने त्या व्यक्तीची तपासणी करण्याचे आदेश महापौर कुलकर्णी यांनी वैद्यकीय विभागाला दिले. त्याचबरोबर जेथे परदेशातून नागरिक आले असतील, त्यांची माहिती तातडीने महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा रुग्णालयाकडे कळविण्याचे आवाहन केले.

महिला समितीची सहल रद्द 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महिला व बालकल्याण समितीचा कन्याकुमारी व कोचीनचा अभ्यासदौरा स्थगित करताना मासिक सभाही रद्द केल्याचे सभापती हेमलता कांडेकर यांनी सांगितले. महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या, पदाधिकाऱ्यांचा विमानाने मुंबई, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, आलपी, कोचीन अभ्यासदौरा होता. त्यासाठी ट्रॅव्हल कंपनीकडून देकारही मागविले होते. परंतु आता अभ्यासदौरा स्थगित करण्यात आला आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com