esakal | सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Gold and silver prices continue to fall Nashik Marathi News

सराफा बाजारात सोने दरात सातत्याने घसरण होत असून, गेल्या दहा महिन्यांत सोने दराचा निच्चांक दिसून येत आहे. सोन्याची किंमत शनिवारी (ता.६) कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक  : सराफा बाजारात सोने दरात सातत्याने घसरण होत असून, गेल्या दहा महिन्यांत सोने दराचा निच्चांक दिसून येत आहे. सोन्याची किंमत शनिवारी (ता.६) कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याची झळाळी सातत्याने कमी होताना दिसत आहे. सोन्याचा दर प्रतितोळा ४७ हजार रुपये खाली आला असून, सातत्याने घसरण सुरू असल्यामुळे ऐन लग्नसराईत आनंदाचे वातावरण आहे. 

कोरोनाकाळात सोने-चांदीचे दर ५८ हजारपर्यंत वाढले असल्याचे चित्र होते. मात्र, महिन्याभरापासून दर सातत्याने कमी होत असून, सराफा बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी झाली. शनिवारी नाशिकमधील सराफा बाजारात सोन्याचे दर ४६ हजार ३००, तर चांदीचे दर ६७ हजार २०० रुपये होते. सोन्याच्या दरात गेल्या आठवडाभरात प्रतितोळा दीड हजार रुपयांची घसरण झाली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू होण्याआधीच सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरत होत असल्यामुळे येत्या काळात ग्राहकांचा फायदा होणार आहे. कोरोनावर लस आल्याचा हा परिणाम असू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे सोन्याचे दरांमध्ये चढ उतार होत असल्याची स्थिती आहे. चांदीही ७० हजारांपर्यंत गेली होती. ती आता ६७ हजारापर्यंत खाली आहे. लग्नसराईत कमी झालेल्या दरामुळे दागिन्यांना महिन्याभरापासून अधिक मागणी आहे. इंधनाच्या किमती एकीकडे भडकत असताना आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारामुळे सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. किमती स्थिर नसल्यामुळे त्यात कोरोनाची परिस्थितीमुळे सोने-चांदीच्या किमतीत येत्या काही दिवसात कमी-अधिक प्रमाणात बदल होणार असल्याची शक्यता आहे. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

कोरोनाकाळात ५८ हजाराच्या आसपास गेले होते, सोने खरेदीसाठी गोल्डन सुवर्णसंधी असून, आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार होत असून सोन्याच्या किमतीतही बदल होऊ शकतात. 
- क्रिष्णा नागरे, सराफ व्यावसायिक 

 
सोने स्वस्त होणे सराफ व्यावसायिकांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. ग्राहकांचा उत्साह चांगला असून, महिनाभरात ग्राहकांचा प्रतिसाद वाढला आहे. सर्व दागिन्यांना चांगली मागणी आहे. 
- गिरीश टकले, सराफ व्यावसायिक 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

go to top