चहा पिण्यासाठी मालक बाहेर गेला, बघून 'त्याने' साधला डाव...अन् गेला बाराच्या भावात!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

(जुने नाशिक) पश्‍चिम बंगाल येथील संशयिताने जुने नाशिक, पठाणपुरा भागातील सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारागिराच्या घरी चोरी करत सुमारे एक लाख 21 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. भद्रकाली गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत त्यास अटक केली. 

नाशिक : (जुने नाशिक) पश्‍चिम बंगाल येथील संशयिताने जुने नाशिक, पठाणपुरा भागातील सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारागिराच्या घरी चोरी करत सुमारे एक लाख 21 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. भद्रकाली गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत त्यास अटक केली. 

असा आहे प्रकार

हबीब मलिक (वय 26, रा. मूळ कोलकता) यांचे पठाणपुरा येथे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम चालते. त्यांच्याकडे काही पश्‍चिम बंगाल येथील कारागीर काम करतात. काही दिवसांपूर्वी पिंपळगाव बसवंत येथील सोन्याचे दागिने विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने त्यांना मंगळसूत्रात वापर करण्यात येणाऱ्या मीना डिझाइनच्या सोन्याच्या पुंगळ्या बनविण्याचे काम दिले होते. मंगळवारी (ता. 24) त्यांनी कामासाठी आणलेले 92 हजारांचे दोन तोळे चार ग्रॅम सोने आणि 23 हजारांची रोकड चोरी झाल्याचे श्री. मलिक यांच्या लक्षात आले. सोमवारी (ता.23) सकाळी श्री. मलिक त्यांच्या घरास कडी लावून चहा पिण्यासाठी बाहेर गेले. ही संधी साधत संशयिताने घरातील सोने आणि रोकड लंपास केल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला. मलिक यांच्याकडे काम करणारा संशयित सद्दामहुसेन खालिक सैफुल्ला शेख (रा. पश्‍चिम बंगाल) याचे नाव समोर आले. 

हेही वाचा > #Lockdown : ...अन् कामानिमित्त गेलेल्या 'त्या' युवकांच्या परतीच्या प्रवासाची परवानगी मिळाल्याने नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला!

त्याच्या संशयास्पद हालचालीमुळे त्यास कामावरून काढून टाकले असल्याचे सांगितले. गुन्हे शोध शाखेच्या पथकाने संशयिताच्या मिळालेल्या वर्णनावरून त्यास गंगागोदावरी भागातून ताब्यात घेतले.  

हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 'त्या' अनोळखी तरुणाच्या मदतीला देवदूतासारखा धावून आला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold was stolen from a craftsman's house nashik marathi news