पायी निघालेल्यांना 'नाशिक'चा मदतीचा हात...'ते' म्हणाले बस नव्हे ही तर लॉटरीच!

bus for migrant.jpg
bus for migrant.jpg

नाशिक : 'मुंबईसे नाशिक तक पैदल आये...यहा बस मिलनेसे बहुत बडी राहत मिली हैं, एमपी तक पैदल चलने दिक्कत से छुटकारा मिला हैं...अशी भावना रतलाम (मध्य प्रदेश) येथील संतोष विश्‍वंभर या परप्रांतीय मजूराने सांगितले. मुंबईहून कुटुंबासह तीन दिवसांपासून पायपीट करीत असलेल्या विश्वभंर कुटुंबाला बराच दूरचा पल्ला गाठायचा आहे. मात्र अचानक नाशिकहून मध्य प्रदेशसाठी बसची सोय असल्याचे कळाल्यानंतर सगळ्या कुटुंबासाठी आनंदोत्सव ठरला.

मजुरांची राज्याच्या सीमेपर्यंत बोळवण

मुंबईहून नाशिक मार्गे परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्यांची पायपीट सुरु आहे. बुधवारी 101 बसने 2 हजारावर मजूर रवाना झाले. आतापर्यंत गेल्या चार दिवसात नाशिक जिल्ह्यातून 40 हजारांहून अधिक मजुरांची राज्याच्या सीमेपर्यंत बोळवण करण्यात आली. मुंबईतून सोय होत नसल्याने मुंबईतून नाशिकपर्यंत पायी चालत येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. नाशिकला चार दिवसापासून यंत्रणेतर्फे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसशिवाय खासगी ट्रकमधून परप्रांतीयांना त्यांच्या राज्याच्या सिमेपर्यंत पाठविले जात आहे. बुधवारी 13 मार्चला पून्हा गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातील मजूरांसाठी रेल्वे तर शहरातील मजूरांसाठी 101 बसची सोय केली. गेल्या चार दिवसांत जवळपास 40 हजारांहून अधिक मजुरांची संबंधित राज्याच्या सीमेपर्यंत बोळवण केली. मात्र त्यानंतरही पायपीट करणाऱ्या कष्टकऱ्यांची रिघ कायमच आहे. 

बुधवारी मध्य प्रदेश सीमेपर्यंत (50) बस, तर राज्यातील विविध तालुक्‍यांत (51) याप्रमाणे 101 बसने 2 हजार 222 श्रमजीवींची रवानगी झाली. मुंबईहून हजार किलोमीटर पायपीटीच्या निर्धाराने निघालेल्यांची नाशिकहून परिवहन महामंडळाने बसची सोय केल्याने परप्रांतीय मजूरांसाठी मोठा दिलासा ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com