esakal | उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 
sakal

बोलून बातमी शोधा

rameshwar 1234.jpg

रामेश्‍वर उच्चशिक्षित असल्याने प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे त्यांचे स्वप्न आहे. बँकिंग, रेल्वे, ग्रामसेवक, तलाठी अशा विविध प्रकारच्या परीक्षा ते देत आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडून मिळेल ती कामे केली जात आहेत.

उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : रामेश्‍वर उच्चशिक्षित असल्याने प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे त्यांचे स्वप्न आहे. बँकिंग, रेल्वे, ग्रामसेवक, तलाठी अशा विविध प्रकारच्या परीक्षा ते देत आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडून मिळेल ती कामे केली जात आहेत.

प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न
तीन वर्षे त्यांनी रेल्वेमध्ये खेळणी विक्रीचा व्यवसाय केला. जरा बरी कमाई होत असतानाच लॉकडाउन लागले. रेल्वेसेवा बंद झाली. रेल्वेतील खेळणी विक्रीचा व्यवसाय बारगळला. घरात बसून चालणार नसल्याने कपडे विक्रीचा व्यवसाय केला. नवीन वर्षाच्या दिनदर्शिका विक्रीस आल्या आहेत. त्यानिमित्त रामेश्‍वरसह रेल्वेत खेळणी विक्री करणारे त्याचे अन्य नऊ मित्र शहराच्या विविध भागांत दिनदर्शिका विक्रीचा व्यवसाय करत आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

रेल्वे बंदमुळे दिव्यांग विक्रेत्याची फरफट

उच्चशिक्षित दिव्यांग (दृष्टिहीन) रामेश्‍वर जाधव यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. बी.ए.नंतर तीन वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी रेल्वेत खेळणी विक्री केली. लॉकडाउनमुळे रेल्वे बंद झाल्याने व्यवसाय गेला. त्यानंतर मिळेल ते काम केले. सध्या दिनदर्शिका विक्रीतून उपजीविका भागविली जात आहे. त्यांच्या अन्य नऊ जणांना असाच संघर्ष करावा लागत असल्याचे रामेश्‍वर यांनी सांगितले. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

सरकारने दिव्यांच्या अडचणीकडे लक्ष द्यावे. त्याना रोजगार उपलब्ध करून द्यावा. जेणेरून त्यांना कुणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. तसेच सध्यातरी आम्हाला पुन्हा रेल्वेत खेळणी विक्रीची परवानगी द्यावी. -रामेश्‍वर जाधव (दिव्यांग)