Covid19 : नाशिकहून दिल्लीत मरकजला गेलेल्यांची शोधमोहिम सुरू... क्वांरटाईन करण्याच्या हालचाली गतीमान

corona.jpg
corona.jpg

नाशिक : दिल्लीत मरकजला गेलेल्या जिल्ह्यातील तबलिकी नागरिकांची ओळख पटवून त्यांना रुग्णालयात क्वांरटाईन करण्याच्या हालचाली दुपारनंतर गतीमान झाल्या. सगळे संशयित ताब्यात आल्यानंतर सगळ्यांना रुग्णालयांमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तोपर्यत मात्र प्रशासनाने कुठलीही माहीती उघड करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

संशयितांची वैद्यकिय तपासणी करुन प्रसंगी रुग्णालयात क्वारंटाईन करणार

दिल्लीत मरकजला जमलेल्या तबलिकी नागरिकांमध्ये कोरोना संशयित सापडल्याचे उजेडात आल्यानंतर दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नाशिकमधील तबलिकी नागरिकांची शोध मोहीम सुरु झाली आहे. नाशिक शहरातील अकरा आणि जिल्ह्यातील इतरही भागातून तबलिकी नागरिक दिल्लीला गेल्याची माहीती मिळाल्यावरुन प्रशासनाने दुपारनंतर संबधितांचा शोध सुरु केला आहे. मात्र जोपर्यत सगळे संशयित ताब्यात येत नाही तोपर्यत कुठलीही माहीती जाहीर न करण्याची भूमिका घेत, प्रशासकीय उच्चपदस्थ आधिकाऱ्यांनी सगळ्या संशयितांची वैद्यकिय तपासणी करुन प्रसंगी रुग्णालयात क्वारंटाईन करणार असल्याचे स्पष्ट केले. 

वैद्यकिय तपासणी झाल्यानंतरच माहीती उघड केली जाणार

कोरोनाच्या साथ रोगाच्या प्रादुर्भाव वाढण्यात दिल्लीतील मरकज कार्यक्रमात सहभागी असलेल्या तबलिकीचा समावेश असल्याचे पुढे आल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली. केंद्रीय यंत्रणेकडून विविध जिल्ह्याला यासंदर्भात सर्तक करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणेच्या निर्देशानंतर जिल्ह्यात मरकजला गेलेल्या तहबलिकांचा शोध सुरु झाला त्यात नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तबलिकी संशयित असल्याचे पुढे आल्यानंतर दुपारनंतर ही शोध मोहीम सुरु झाली. संशयितांच्या वैद्यकिय तपासणीसाठी हे ताब्यात घेतले जाणार आहे. मात्र त्यामुळे नागरिकांत घबराट पसरु नये म्हणून याविषयी माहीती गोपनीय ठेवण्यात आली आहे. सगळ्या संशयितांची ओळख पटवून त्यांची वैद्यकिय तपासणी झाल्यानंतरच माहीती उघड केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

रुग्णालयात क्वारंटाईन

दिल्लीत मरकजला नाशिक शहर जिल्ह्यातूनही लोक गेले होते. त्यांना शोधून वैद्यकिय तपासण्या करुन गरजेनुसार कोरोना संशयितांना रुग्णालयात क्वारंटाईन केले जाणार असल्याचे उच्चपदस्थ आधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com