'जो आपल्याशी नडला त्याला आपण फोडला!'...'इथं' गुंडच देताय पोलिसांना आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime gang.jpg

यावरच ते थांबले नाहीत, तर त्यातील काहींनी थेट चाकू काढून प्राणघातक हल्ला केला. यानंतर अंबड पोलिसांत तक्रार करूनही पोलिसांकडून केवळ वरवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीच्या नातेवाइकांनी केला. सायंकाळी अंबड भागात पाणीपुरी विक्रेता व स्थानिक नागरिकांवर सराईत गुन्हेगारांकडून धारदार हत्याराने वार केला. 

'जो आपल्याशी नडला त्याला आपण फोडला!'...'इथं' गुंडच देताय पोलिसांना आव्हान

नाशिक : सिडको परिसरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. उपेंद्रनगर येथे कारला धक्का लागला, म्हणून पाच ते सहा अल्पवयीन मुलांनी दुचाकी चालकावर 
प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाईचा देखावा होत असल्याने गुंडांना खुले रान मिळत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. 

गुन्हेगारीच्या घटनांत होतेय वाढ
 

26 जानेवारीला एकीकडे प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे गुंडांचा हैदोस सुरू होता. सकाळी उपेंद्रनगर येथे कारला धक्का लागला म्हणून दुचाकी चालक कुणाल साळुंखे (वय 23, रा. गणेश चौक) याला कार (एमएच 46, डब्ल्यू 0919) मध्ये 
बसलेल्या चालकासह पाच ते सहा अल्पवयीन मुलांनी बेदम मारहाण केली. यावरच ते थांबले नाहीत, तर त्यातील काहींनी थेट चाकू काढून प्राणघातक हल्ला केला. यानंतर अंबड पोलिसांत तक्रार करूनही पोलिसांकडून केवळ वरवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीच्या नातेवाइकांनी केला. सायंकाळी अंबड भागात पाणीपुरी विक्रेता व स्थानिक नागरिकांवर सराईत गुन्हेगारांकडून धारदार हत्याराने वार केला. दिव्या ऍडलॅब भागात दोन गटांच्या गुंडांकडून प्रचंड हाणामारी झाली. यातही धारधार हत्याराचा वापर केल्याने परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. 

हेही वाचा > 'बिन भिंतींची उघडी शाळा, लोखो सोसाव्या लागताय येथे कळा!'..चिमुकल्यांची आर्त हाक...

गुन्हे शोधपथक नावालाच 

परिसरात कोणत्याही प्रकारचे गुन्हे वाढत असताना त्यावर कारवाईची मुख्य जबाबदारी गुन्हे शोधपथकाकडे असते. अनेक गुन्हे घडण्याअगोदरच त्याची माहिती समोर यायला हवी. मात्र, पथकातील कर्मचारी निर्धास्त झाले असून, अनेक कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे व्यावसायिकांशी हितसंबंध जोडल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. 

जुन्या अधिकाऱ्यांची आठवण 

यापूर्वी अंबड पोलिस ठाण्याकडे अधिकारी बाळकृष्ण बोरकर, दिनेश बर्डेकर, मधुकर कड, सोमनाथ तांबे यांनी नियोजनबद्ध काम करीत सिडको परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले होते. उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, अतुल झेंडे, राजपूत यांसारख्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली होती. त्यानंतर सिडकोतील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, छोट्या-मोठ्या घटना पोलिसांना आव्हान देत आहेत. 

हेही वाचा > वेदनादायक! "माझ्या डोळ्यादेखत माझी पत्नी पाण्यात बुडत होती अन् मी"....

टॅग्स :Nashik