esakal | 'या' गावचे शेतकरी पुन्हा डाळींबाच्या प्रेमात...!
sakal

बोलून बातमी शोधा

pomegranates.jpg

तेल्या हद्दपार झाल्यानंतर शेतकरी पुन्हा डाळिंबाकडे वळले. दोन वर्षांपासून लागवडीत वाढत आहे. त्यातच वर्षभरात लक्षणीय वाढ झाली. इतर पिके बेभरवशाचे झाल्याने, तसेच पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने पुन्हा कसमादे पट्ट्यात डाळिंबाच्या बागा बहरण्यास सुरवात झाली आहे. सध्या डाळिंबाला 50 ते 70 रुपये किलो दर मिळत आहे. 

'या' गावचे शेतकरी पुन्हा डाळींबाच्या प्रेमात...!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) नगदी पीक म्हणून कसमादेतील शेतकरी पुन्हा डाळिंबाच्या प्रेमात पडले असून, मुबलक पाणी असल्याने वर्षभरात जवळपास 15 हजार हेक्‍टर क्षेत्र वाढले आहे. तेल्या व मर रोग हद्दपार झाल्याने, तसेच अन्य पिकांची पैसे मिळवून देण्याची शाश्‍वती नसल्याने क्षेत्रवाढीस मदत होत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील डाळिंब क्षेत्र 45 हजार हेक्‍टरपर्यंत पोहचले आहे. 

डाळिंबाला 50 ते 70 रुपये किलो दर

सोलापूरनंतर नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसर डाळिंबाचे आगार आहे. तेल्या व मर रोगामुळे हे फळपीक नष्ट होण्याच्या मार्गावर होते. एकेकाळी 55 ते 60 हजार हेक्‍टरवर असणारा डाळिंब रोगामुळे 20 ते 25 हजार हेक्‍टरवर आला होता. दरम्यान च्या काळात शेतकऱ्यांनी विविध फळपिकांचा प्रयोग केला. शेवगा वगळता अन्य फळपिके फारशी यशस्वी झाली नाहीत. तेल्या हद्दपार झाल्यानंतर शेतकरी पुन्हा डाळिंबाकडे वळले. दोन वर्षांपासून लागवडीत वाढत आहे. त्यातच वर्षभरात लक्षणीय वाढ झाली. इतर पिके बेभरवशाचे झाल्याने, तसेच पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने पुन्हा कसमादे पट्ट्यात डाळिंबाच्या बागा बहरण्यास सुरवात झाली आहे. सध्या डाळिंबाला 50 ते 70 रुपये किलो दर मिळत आहे. 

कसमादेतील डाळिंब क्षेत्र : तालुका- क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 

मालेगाव - 15 हजार 760 
बागलाण - 17 हजार 200 
देवळा - दोन हजार 150 
चांदवड - एक हजार 560 
कळवण - 295 
नांदगाव - 960 
उर्वरित जिल्हा : साडेसात ते आठ हजार  

हेही वाचा > धक्कादायक! आई - वडील रागविले म्हणून त्याने घरातून काढला पळ...अन्

महागडी औषधे व प्रतिकूल हवामानामुळे इतर फळपिके परवडत नाहीत. हवामान चांगले राहिले, तर फळपिकांना हवा तसा भाव मिळत नाही. कसमादेतील शेतकऱ्यांना डाळिंब पिकाची सवय झाली आहे. काही वर्षांपासून भावही चांगला आहे. 50 रुपये भाव मिळाला तर हे फळपीक परवडते. त्यामुळेच शेतकरी पुन्हा डाळिंबाकडे वळले आहेत. 
- अरुण देवरे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ 

हेही वाचा > 'लघुशंका' करणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने...त्यांनी बळजबरीने घरात घुसून
 

go to top