Maharashtra Budget 2021 : पुणे- नाशिक रेल्वे मार्गासाठी १६ हजार १३९ कोटींची तरतूद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 March 2021

महाविकास आघाडी सरकारकडून आज विधिमंळात राज्याचा अर्थसंकल्प आज (ता.८) अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात नाशिकसाठी काही महत्वपुर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.

नाशिक : महाविकास आघाडी सरकारकडून आज विधिमंळात राज्याचा अर्थसंकल्प आज (ता.८) अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात नाशिकसाठी काही महत्वपुर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.

सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात  पुणे-नाशिक या दोन शहरांदरम्यानच्या प्रस्तावित असलेल्या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून १६ १३९ कोटींची तरतूद करण्यात आली. दरम्यान निधीची कमतरता पडू न देता हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करू असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे.

समृद्धी महामार्ग आणि नाशिक - मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार असल्याची घोषणा देखील आज करण्यात आली.  तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी विशेष निधीची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. राज्यात 7 जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा अजित पवार यांनी केली. यामध्ये सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Budget 2021 Provision of 16139 crore for Pune Nashik railway line