मालेगाव महापालिकेतील मानधनावरील भरती तूर्त रद्द; आयुक्तांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

त्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी विचारत घेता भरती प्रक्रिया अंतर्गत थेट मुलाखत तूर्त रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. उक्त भरती प्रक्रियेबाबत पुढील कार्यक्रमाची तारीख नव्याने जाहीर सूचना प्रसिद्ध करून कळविण्यात येईल, असेही कासार यांनी कळवले आहे. 

मालेगाव कॅम्प (नाशिक) : मालेगाव महानगरपालिकेच्या विविध विभागांतील फक्त सहा महिन्यांच्या विशिष्ट कालावधीसाठी निव्वळ मानधन तत्त्वावर होणारी पदभरती संभाव्य कोरोना लाट लक्षात घेता रद्द केल्याची माहिती महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी दिली. 

पुढील कार्यक्रमाची तारीख नव्याने जाहीर होणार

भरतीबाबत १० व १२ नोव्हेंबर रोजी स्थानिक, जिल्हा दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्धीस दिली होती. मात्र सदरची जाहिरात रद्द करत महानगरपालिकेमार्फत २ ते २३ डिसेंबरपर्यंत विविध ४४ पदांसाठी एकूण १००६ जागांसाठी ठोक मानधन तत्त्वावर थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रियेची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात केली होती. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या बैठकीतील संभाव्य दुसऱ्या लाटेच्या कोरोना प्रदुर्भावात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी विविध उपाययोजना राबविणेचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी विचारत घेता भरती प्रक्रिया अंतर्गत थेट मुलाखत तूर्त रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. उक्त भरती प्रक्रियेबाबत पुढील कार्यक्रमाची तारीख नव्याने जाहीर सूचना प्रसिद्ध करून कळविण्यात येईल, असेही कासार यांनी कळवले आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Malegaon Municipal Corporation Recruitment on honorarium canceled nashik marathi news