मॅट्रिमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून लग्नाची फसवणूक; उच्चशिक्षित ‘लखोबा लोखंडे’ सायबर पोलिसांच्या जाळ्यात!

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 5 October 2020

महिलेशी मॅट्रिमोनियल संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्क करत तिच्यासोबत विवाह केला होता. या विवाहानंतर या महिलेला नवऱ्याचे खरे रुप समजले आणि तो फ्रॉड असल्याचे समोर आले. नेमके काय घडले वाचा...

नाशिक : महिलेशी मॅट्रिमोनियल संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्क करत तिच्यासोबत विवाह केला होता. या विवाहानंतर या महिलेला नवऱ्याचे खरे रुप समजले आणि तो फ्रॉड असल्याचे समोर आले. नेमके काय घडले वाचा...

असा घडला प्रकार

कुणाल नंदकुमार जगताप (वय ३७, रा. काठे गल्ली, नाशिक) हा इंजिनिअर असून तो नाशिकच्या काठे गल्लीतील त्रिकोणी गार्डनजवळ राहतो. बेंगलोर येथील एका कंपनीत तो नोकरीला असून विवाह नोंदणी संकेतस्थळावर स्वत:ची प्रोफाईल अपडेट करत तो अविवाहीत असल्याचे भासवित असे. एखाद्या मुलीने सर्चिंग करत त्याच्याशी संपर्क केल्यानंतर तो त्यांना लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.जगतापच्या अमिषाला बळी पडलेल्या राहाता येथील एका विवाहीतेने यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी १ जुलैला गुन्हा दाखल केला होता. जगताप याने या महिलेशी मॅट्रिमोनियल संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्क करत तिच्यासोबत विवाह केला होता. विवाहानंतर या महिलेला जगतापचे खरे रुप समजले आणि तो फ्रॉड असल्याचे समोर आले.

हेही वाचा > पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

जगतापला सुनावली पोलीस कोठडी

अनेक मुलींची त्याने अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर नगरचे सायबर पोलीस आरोपीच्या मागावर होते. तो बेंगलोर येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नगरच्या पोलीस पथकाने बंगळुरू येथे जात त्याला बेड्या ठोकल्या. जगतापला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल 

पोलीस पथकाची कामगिरी

इंजिनिअर असलेल्या कुणाल नंदकुमार जगताप (वय ३७, रा. काठे गल्ली, नाशिक) याने एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांशी संपर्क करत त्यांच्यासोबत लग्न करुन फसवणूक केल्याप्रकरणी नगरच्या सायबर पोलिसांनी या उच्चशिक्षीत असलेल्या लखोबा लोखंडेला बेड्या ठोकल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस नाईक विशाल अमृते, अभिजित अरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage fraud through matrimonial website nashik marathi news