मराठी साहित्य संमेलनासाठी महापालिका सर्वतोपरी मदत करणार - महापौर

विक्रांत मते
Wednesday, 20 January 2021

जगातून व भारतातून येणाऱ्या साहित्यिकांमध्ये  नाशिकचा एक वेगळा ठसा उमटेल अशा पद्धतीने नियोजन केले जाईल. नियोजन करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल असे यावेळी स्पष्ट केले.

नाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असून या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह मनपा पदाधिकारी व साहित्य क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी जागेची बुधवारी (ता. 20) पाहणी केली. हे संमेलन गोखले एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणातील इंजिनिअरिंग कॉलेज समोरील पटांगणात होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्या जागेची पाहणी करण्यात आली. 

नाशिकचा एक वेगळा ठसा उमटेल 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होऊन एक वेगळा ठसा उमटेल यादृष्टीने सर्वांच्या सहभागातून हे संमेलन यशस्वी करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. यावेळी बोलताना महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असून यामध्ये जगातून व भारतातून येणाऱ्या साहित्यिकांमध्ये नाशिकचा एक वेगळा ठसा उमटेल अशा पद्धतीने नियोजन केले जाईल. नियोजन करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल असे यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

यावेळी सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, गजानन शेलार, शाहू खैरे, नगरसेवक गुरुमीत बग्गा, समीर कांबळे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, शंकर बोऱ्हाडे, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, देवदत्त जोशी, गिरीश नातु, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी या मराठी साहित्य संमेलनाची तयारीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor inspected venue of Marathi Sahitya Sammelan nashik marathi news