म्हाडाची नवनिर्मित घरे कोरोना रुग्णांसाठी उपयोगात आणली जातील - जिल्हाधिकारी

0suraj_mandhre_0.jpeg
0suraj_mandhre_0.jpeg

नाशिक : (मालेगाव) शहरातील नागरिकांनी कोणत्याही आजाराची लक्षणे दिसत असल्यास लगेच दवाखान्यात यावे. त्यांना बरे करण्याची पूर्ण क्षमता आरोग्य व्यवस्थेची आहे. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता म्हाळदे शिवारातील म्हाडाची नवनिर्मित घरे उपयोगात आणणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी (ता. 24) येथे सांगितले. 

सोयीसुविधांची केली तपासणी

श्री. मांढरे म्हणाले, की दवाखान्यात दाखल झालेले दहा रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल. कंटेन्मेंट व बफर झोनमधील उपलब्ध मनुष्यबळ व स्वयंसेवकांचा पुरेपूर वापर करून महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचत असल्याची खात्री करावी. भाजीपाला व दुधाचे नियोजन यापूर्वीच केले आहे. त्याप्रमाणे प्रत्यक्ष वितरण होत असल्याची रोज खात्री करावी. मुस्लिम बांधवांना उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या फळांचा पुरवठा होण्यासाठी हॉटेल स्टारजवळील मोकळ्या जागेत बॅरिकेडिंगसह आवश्‍यक सुविधा द्याव्यात. नागरिकांत सुरक्षित अंतर राहील, याची दक्षता घ्यावी. म्हाळदे शिवारातील नवनिर्मित घरांची शुक्रवारी पाहाणी करून तेथील सोयीसुविधांची माहिती श्री. मांढरे यांनी जाणून घेतली. 

रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल लवकर प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा

विश्रामगृहात कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. श्री. भुसे म्हणाले, की दाखल होणारे संशयित कोरोना रुग्णांसह विलगीकरण केलेली व ज्यांचे नमुने तपासणीसाठी गेले आहेत, अशा रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल लवकर प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा करावा. त्याचबरोबर अपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात जबाबदारी सोपवावी. प्रत्येकाने ती प्रामाणिकपणे पार पाडावी, असे त्यांनी आवाहन केले. अपर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरप्रमुख डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसीलदार चंद्रजित राजपूत, शिवकुमार आवळकंठे आदी उपस्थित होते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com