esakal | बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

girl died.

 तापलेल्या पाण्याने भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या ती तेरा वर्षाच्या अल्पवयीन विवाहीत चिमुरडीचा जीवन संघर्ष अखेर संपला आहे.

बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : तापलेल्या पाण्याने भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या ती तेरा वर्षाच्या अल्पवयीन विवाहीत चिमुरडीचा जीवन संघर्ष अखेर संपला आहे. आता उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाल्याने तीच्या आईने सासरच्या लोकांनी उपचारात हलगर्जी केल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची फिर्याद वणी पोलिसांत दिली आहे

कोरोना साथरोग लॉकडाऊन काळात लग्न समारंभास शासनाची परवानगी नसतांना देखील ही २ मे २०२० रोजी रेणुका ( वय १३ वर्ष ३ महिने) असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे रा. खंबाळेवाडी ता. इगतपूरी याच्याशी चोरून करण्यात आला होता. पण एका भयाणक अपघातानंतर प्रकरण बाहेर आले होते

 असे बाहेर आले प्रकरण

विवाहीत अल्पवयीन मुलीच्या माहेरचे नातलगाच्या दशक्रिया विधीसाठी विवाहीता करंजवन, ता. दिंडोरी येथे २४ नोव्हेंबर २०२० रोजी आले असता, पहाटे गरम पाण्याचा ड्रम सांडल्याने गायत्री उर्फ रेणुका किरण बिडवे व तिची ननंद प्रतीक्षा बिडवे यांच्या अंगाखाली गरम पाणी जाऊन त्यांच्या पाठीचे भागाला जळून त्यांना दुखापती झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना पोलिसांनी तसेच बाल कल्याण समिती नाशिक यांनी मुलीचे जाब जबाब घेतले असता, मुलगी रेणुका हिचा बालविवाह झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी करंजवणचे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी २२ जानेवारी २०२१ रोजी किरण संजय बिडवे, संजय बिडवे, संगिता संजय बिडवे, रा.खंबाळेवाडी, ता. इगतपूरी, आई ज्योती पितांबर जाधव, रा. लखमापूर, ता. दिंडोरी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गरम पाण्याने सुमारे पन्नास टक्के भाजलेल्या रेणूका उर्फ गायत्रीचा २७ जानेवारी रोजी घोटी येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

वणी पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी मयत मुलीची आई ज्योतीबाई पिंताबर जाधव वय 49, रा. लखमापूर यांनी मुलगी रेणुका ऊर्फे गायत्री हिचे पती किरण संजय बिडवे, सासरे संजय नथु बिडवे, सासु संगिता संजय बिडवे सर्व रा. खंबाळेवाडी, घोटी ता. इगतपुरी जि. नाशिक अशांनी हयगईने ड्रम मधील गरम उकळते पाणी काढत असतांना ते अनावधानाने सांडल्याने त्यात माझी मुलगी रेणुका ऊर्फे गायत्री किरण बिडवे हिचे गंभिर भाजण्यास कारणीभुत होवुन तिच्यावर औषधोपचार करणे गरजेचे असतांनाही औषधोपचार न करता, हयगई व अविचाराने निष्काळजीपणाने तिला घरीच ठेवुन तीच्या मरणास कारणीभुत झाल्याबाबत वणी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

go to top