36 वर्षांनंतर तलाठी सज्जावाढीला मुहूर्त! नागरिकांची गैरसोय थांबणार

talathi office.jpg
talathi office.jpg

नाशिक / येवला : राज्यातील वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण लक्षात घेता जिल्ह्यात नवीन 175 तलाठी सज्जे व 29 महसूल मंडलांची वाढ झाली आहे. 2017 पासून ही प्रक्रिया सुरू होती. तिला अखेर मूर्तस्वरूप मिळाल्याने अनेक गावांची गैरसोय दूर होणार आहे. 

पुनर्रचनेत जिल्ह्यात 175 सज्जे अन्‌ 29 महसूल मंडल कार्यान्वित 
1984 पासून तलाठी सज्जाची पुनर्रचना झाली नव्हती. गावची लोकसंख्या आणि खातेदार वाढत असताना सर्कल व तलाठी संख्या मर्यादित होती. एका सज्जेत दोन ते सहापर्यंत गावे आणि एका तलाठ्याकडेही दोन ते तीन सज्जांचे काम होते. तलाठी सज्जांची पुनर्रचनेची मागणी तलाठी महासंघांकडून सातत्याने सुरू होती. 2017 मध्ये शासनाने तलाठी सज्जावाढीस मान्यता दिली. ऑक्‍टोबर 2018 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिसूचना प्रकाशित करून सज्जे व समाविष्ट गावे निश्‍चित केली होती. त्यावर आता कार्यवाही झाली आहे. 

36 वर्षांनंतर तलाठी सज्जावाढीला मुहूर्त! 
महसूल नोंदी व करवसुली, सातबारा उतारा देण्यासह ऑनलाइन काम, अवैध गौण खनिजविरोधात कारवाई आदी कामे मार्गी लावणारा तलाठी गावाच्या कामकाजाचा कणा असतो. आतातर त्यांना संजय गांधी निराधार योजना, निवडणूक, पुरवठा विभाग, पिकांसह विविध पंचनामे, सर्वेक्षण असे अतिरिक्त कामांचे ओझे वाहावे लागत आहे. त्यात मर्यादित सज्जे आणि अपुऱ्या तलाठ्यांमुळे कामाचा ताण सहन करण्याची वेळ तात्यावर येत होती. पण, आता त्यांना दिलासा मिळणार आहे. 

नागरिकांची गैरसोय थांबणार
जिल्ह्यात एक हजार 960 गावे असून, त्याचा कारभार 532 सज्जे व 92 मंडलाधिकाऱ्यांवर होता. अनेक गावांचा कार्यभार असल्याने वारानुसार गावे वाटून कामकाज करताना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. नव्या निर्णयानुसार जिल्ह्यात आता 175 वाढल्याने 707 सज्जे झाले आहेत. पुनर्रचनेत निफाड, येवला, मालेगाव, सिन्नर, सटाण्यात सर्वाधिक तलाठी सज्जे वाढले असून, आता एका सज्जेत एक ते तीन किंवा चार गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात 29 मंडलेही वाढल्याने संख्या 121 झाली आहे. तालुकानिहाय तहसीलदारांनी आदेश काढून सज्जाच्या कामकाजाची जवाबदारी वाटून दिली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय थांबणार आहे. 

शेतकऱ्यांची कामे वेळेत

संघटनेच्या मागणीची दखल घेऊन सज्जेवाढीचा निर्णय शासनाने घेतला होता. अनेक तलाठ्यांकडे पाच ते 10 गावांची जबाबदरी असल्याने कामे करण्यास मर्यादा येतात. आता निर्णयावर अंमलबजावणी करत सज्जे कार्यान्वित केल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेत होऊ शकतील. शासनाने लवकरच नवीन भरती करून तलाठ्यांचा कामाचा भार हलका करावा. -विठ्ठल शिंदे, 
विभागीय सरचिटणीस, निफाड उपविभाग, जिल्हा तलाठी संघ
 
 
जिल्ह्यात सज्जे व महसूल मंडलांची वाढ झाली आहे. त्यासाठी पदनिर्मिती झालेली नाही. याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. आता सज्जे कार्यान्वित होऊन अतिरिक्त कारभार आहे. त्यांच्यावर विभागून दिला आहे. - राजेंद्र नजन, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय 

...अशी झाली सज्जाची वाढ 
तालुका जुने सज्जे नवीन सज्जे 
नाशिक 42 59 
निफाड 55 63 
सिन्नर 39 69 
मालेगाव 57 75 
कळवण 35 36 
सुरगाणा 28 35 
चांदवड 35 44 
देवळा 19 23 
इगतपुरी 33 38 
त्र्यंबक 19 27 
दिंडोरी 42 55 
पेठ 20 24 
येवला 34 50 
नांदगाव 27 45 
बागलाण 47 64  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com