चिंताजनक! जिल्ह्याला कोरोनाची मगरमिठी...बळींची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर

corona patients death_1.jpg
corona patients death_1.jpg

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (ता. 25) कोरोनामुळे आणखी सात जणांचा बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर म्हणजेच 199 वर पोचली आहे. गुरुवारी नाशिक शहरात चार, तर नांदगाव, येवला आणि निफाड तालुक्‍यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. तसेच, जिल्ह्यात 150 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सर्वाधिक 104 रुग्ण नाशिक शहरातील असून, मालेगावचे दोन, उर्वरित जिल्ह्यातील 34 व अन्य जिल्ह्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील मृतांची संख्या 199 
 
गुरुवारी गंजमाळच्या भीमवाडीतील 65 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात, खडकाळीच्या रमाबाई आंबेडकरनगरमधील 73 वर्षीय महिला व काझीपुरा येथील 65 वर्षीय महिलेचा "मविप्र'च्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात व जेल रोड भागातील मॉडेल कॉलनीतील 48 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तसेच, पिंपळस (ता. निफाड) येथील 57 वर्षीय पुरुषाचा "मविप्र' रुग्णालयात, येवल्याच्या आझाद चौकातील 90 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात, तर वडाळी (ता. नांदगाव) येथील 32 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे घरातच मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 199 झाली. यात, नाशिक शहरातील 81, मालेगाव शहरातील 71, तर उर्वरित जिल्ह्यातील 36 व अन्य जिल्ह्यांतील 11 जणांचा समावेश आहे. 

शंभर रुग्ण कोरोनामुक्त 

दरम्यान, गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या शंभर रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये नाशिक शहरातील 38, मालेगावातील तीन, परजिल्ह्यातील एक आणि उर्वरित जिल्ह्यातील 58 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार 854 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात पूर्णत: बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 56.08 टक्के आहे. यात सर्वाधिक 81.81 टक्के प्रमाण हे मालेगावातील असून, नाशिक - 39.37 टक्के, उर्वरित जिल्हा 57.58 टक्के, तर परजिल्ह्यातील प्रमाण 62.50 टक्के आहे. 

नाशिकमध्ये सर्वाधिक रुग्ण
 
गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात 150 पॉझिटिव्ह अहवाल आले. यात नाशिक शहरात सर्वाधिक 104 रुग्ण आहेत. परजिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्याच्या शिरपूरमधील दोन आणि शहराच्या बडगुजर भागातील एक असे तिघे, कुर्ला (मुंबई) येथील दोन, तर औरंगाबाद, नंदूरबार, भुसावळ (जि. जळगाव) व शहापूर (जि. ठाणे) येथील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यात मालेगावात दोन, इगतपुरीमध्ये पाच, धुळवड (ता. सिन्नर) येथे एक, दिंडोरीत दोन, निफाड तालुक्‍यातील आहेरगाव, विंचूर, पिंपळगाव बसवंत, म्हाळसाकोरे, पिंपळस, ओझर याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. येवल्यात पुन्हा सात आणि मनमाडमध्ये एकाला लागण झाली आहे, तर हरसूलमध्ये पाच रुग्ण बाधित आहेत. 

या भागांत वाढले रुग्ण 

नाशिक शहरात पुन्हा 104 कोरोनाबाधित रुग्ण वाढले. यात, सर्वाधिक 27 रुग्ण पंचवटीतील तारवालानगर, हिरावाडी, आडगाव, मखमलाबाद नाका, मखमलाबाद रोड, पेठ रोड, हनुमानवाडी परिसरातील आहेत. जुने नाशिकमधील सारडा सर्कल, पखाल रोड, बागवानपुरा, रविवार पेठ आदी भागांत रुग्ण वाढले आहेत. त्याचप्रमाणे, गंगापूर रोड परिसरात 66 वर्षांच्या पुरुषालाही कोरोनाची लागण झाली, तर सातपूर कॉलनी, सिडकोतील पाटीलनगर, जुने सिडको आणि नाशिक रोडलाही कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. 

प्रलंबित रिपोर्ट वाढले 

काही दिवसांपासून शहरातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोना अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाणही वाढले आहे. गुरुवारी 638 अहवाल प्रयोगशाळांकडे प्रलंबित होते. यात नाशिक शहरातील 294, तर मालेगावातील 268 व उर्वरित जिल्ह्यातील 76 अहवालांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत 15 हजार 133 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यातील कोरोनाची सद्यःस्थिती 
जिल्हा/शहर पॉझिटिव्ह रुग्ण उपचारार्थ दाखल मृत्यू 

नाशिक शहर ----- 1580 877 81 
मालेगाव शहर ------ 964 104 71 
उर्वरित जिल्हा ----- 660 244 36 
परजिल्हा ----- 104 28 11 
एकूण ----- 3308 1253 199  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com