esakal | भयंकर! इमारतीच्या गेटवर नाव भलतेच..अन् आतमध्ये चालायचा "धक्कादायक' प्रकार..
sakal

बोलून बातमी शोधा

kuntankhana.jpg

विशेष म्हणजे येथे येणाऱ्या गरजू मुलींची छायाचित्र ठराविक जणांना सोशल मीडियावर टाकले जातात. पोलिसांनी यापूर्वी याच भागात कारवाई करण्यात आली होती. तरीही या प्रकारांना आळा बसला नव्हता. अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिसांनी सध्या मोहीम सुरू केली आहे. 

भयंकर! इमारतीच्या गेटवर नाव भलतेच..अन् आतमध्ये चालायचा "धक्कादायक' प्रकार..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मालेगाव शहराजवळील मनमाड चौफुलीवरील सत्यम लॉजजवळ चालणाऱ्या कुंटणखान्यावर अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पोलिस पथकाने छापा टाकून कुंटणखाना चालविणाऱ्या रवींद्र मगर (वय 40, रा. साकूर, ता. मालेगाव) याच्यासह पीडित महिलेस ताब्यात घेतले. लॉजमालक अंकुश चंदिले (रा. कलेक्‍टरपट्टा) फरारी झाला. मंगळवारी (ता. 18) रात्री ही कारवाई करण्यात आली. शहरातील काही ठराविक लॉजमध्ये गरजू महिलांकडून अनैतिक व्यापार करून घेतला जातो. पोलिसांनी यापूर्वी याच भागातील एका लॉजवर कारवाई कारवाई केली होती. तरीही या प्रकारांना आळा बसला नव्हता. अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिसांनी सध्या मोहीम सुरू केली आहे. 

मालेगावला कुंटणखान्यावर छापा 

जिल्हा पोलिसप्रमुख आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर कोते, पोलिस शिपाई तुषार अहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते, समाधान सानप, महिला शिपाई श्रीमती देवरे, सूर्यवंशी आदींनी हा छापा टाकला. सुयश लॉज असे लिहिलेल्या इमारतीच्या डाव्या बाजूला चॅनल गेटवर सत्यम लॉज हा फलक लावून गरीब व गरजू मुलींकडून कुंटणखाना चालविला जात होता. विशेष म्हणजे येथे येणाऱ्या गरजू मुलींची छायाचित्र ठराविक जणांना सोशल मीडियावर टाकले जातात. पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध किल्ला पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. फरारी झालेल्या संशयिताचा शोध सुरू आहे. गेल्या आठवड्यातच पोलिसांनी येथील साठफुटी रोड व कॉलेज स्टॉपजवळील कॅफे शॉपवर कारवाई करून तरुण-तरुणींना ताब्यात घेतले होते. या गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी जोर धरत आहे. 

हेही वाचा > ज्या आईच्या उदरातून जन्म घेतला, त्यावरच 'त्याने' घाव घातला...

अल्पवयीन तरुणीस वडगावहून पळविले 
मालेगाव : शहरालगतच्या वडगाव येथील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत मुलीच्या चुलत्याने वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्यात रात्री तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा > सुनेला वाचविण्यासाठी 'ते' पुढे सरसावले!...तर मुलाने त्यांनाच