२०२१ च्या जनगणनेआधारे घोटीची होणार नगर परिषद; कार्यवाही निर्णायक वळणावर 

 ghoti municipal council proposal
ghoti municipal council proposal

घोटी (जि. नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गालगत असल्याने खरेदी-विक्रीसाठी सदैव वर्दळ असलेल्या घोटी शहराच्या दृष्टीने जनगणना वाढताना नागरी सुविधांवर ताण येत आहे. शासनाकडून भरगच्च निधीच्या असलेल्या कमतरतेमुळे ग्रामपालिका कारभाऱ्यांना विकासाकरिता मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी नगर परिषदेचा प्रस्ताव निर्माणाची वेळ ठेपली आहे. यासाठी २०२१ च्या जनगणनेनुसार घोटी नगर परिषदेची वाटचाल सुरू होणार आहे. यासाठी नगररचना विभागाची कार्यवाही निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. 

नगर परिषद प्रशासन संचानालय महाराष्ट्र शासन यांच्या लोकसंख्या निकषानुसार ‘क’ वर्षाकरिता घोटी शहराला २०११ च्या निकषांवर तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे नगर परिषद आस्थापन आकृतिबंधाचा घेतलेला मागोवा लक्षात घेता, २०२१ च्या जनगणनेच्या प्रस्तावित नगर परिषदेच्या ‘क’ वर्गातील नगर परिषद सहजपणे शक्य होत असल्याचे दिसून येत आहे. नगर परिषद झाल्यास नागरी सुविधांवर येणारा ताण कमी होऊन शहरात विकासाची गंगा वाहणार आहे. 
रस्ते विकास, भुयारी गटारी, अतिक्रमण, पाणीपुरवठा, रस्ते, जलशुद्धीकरण, भाजी विक्री मंडई, सुलभ सौचालय, वाचनालय आदींसाठी निधी कमतरतेमुळे नागरी सुविधांवर येत असलेला ताण कमी होणार आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या जनतेचा ओघ बाराही महिने कमी होत नाही. यामुळे व्यापारी, छोटे-मोठ्या दुकानांना चांगलाच फायदाच होत असतो. मात्र, त्यांना सुविधा देताना ग्रामपालिकेस अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या 

शहराचे भौगोलिक क्षेत्र १७८४.२३ हेक्टर, गावठाण १४.२७, वनजमीन ५०.४२, रेल्वे १०.१३, इतर ९.४१ याप्रमाणे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार २४,८३८ लोकसंख्या असून, मतदार १,५९३ इतके असल्याने तत्कालीन नगर परिषद आस्थापना निकषाला तांत्रिकदृष्ट्या अडचण दिसून आली. यामुळे शहराचा नगर परिषदेचा प्रस्ताव खोळंबला, मात्र २०२२ मध्ये लोकसंख्याबहुल झाल्याने याचा विचार शासनदरबारी अपेक्षित असल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

शासनाकडून दखल 

सद्यःस्थितीत तहसीलदार यांच्या निवडणूक मतदान आकडेवारी माहितीनुसार मतदान १६ हजार ४०६ आहे. यातील महिला मतदान ७,७८८, पुरुष ८६१८ आहे. लोकसंख्येचा आकडा जनगणना न झाल्याने कळू शकला नाही. निश्चितच लोकसंख्या २५ हजारांचा टप्पा पार करणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. नगर परिषद प्रशासन संचालनालय निकषांवर ‘क’ वर्गासाठी २५ ते ४०,००० हजार लोकसंख्या व नगरपंचायतीकरिता दहा हजार ते २५ हजार लोकसंख्या निकष पुरेपूर प्राप्त होत असल्याने प्रस्तावावर नगर परिषद प्रशासन संचनालय महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा दखल घेतली आहे. 

नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. २०२१ चा जनगणना अहवाल सादर होताच घोटी नगर परिषद करण्याच्या दृष्टीने मंत्रालय स्तरावरील पाठपुराव्यास पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. 
-हिरामण खोसकर, आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com