''घाबरू नका! सगळ्याच रुग्णांना बेडची गरज नाही''; जिल्हा रुग्णालयातील विशेषाधिकारी प्रमुख डॉक्टरांची माहिती

विनोद बेदरकर
Thursday, 8 April 2021

''कोरोनाची संख्या लक्षणीय गतीने वाढत आहे. हे खरे आहे. पण सगळ्याच रुग्णांना बेडची गरज नाही. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. अनेक जण बेडची गरज नसतांनाही केवळ घाबरल्यामुळे बेडसाठी आग्रह धरतात.''

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील विशेषाधिकारी प्रमुख डॉ. सैंदाणे म्हणाले, कोरोनाची संख्या लक्षणीय गतीने वाढत आहे. हे खरे आहे. पण सगळ्याच रुग्णांना बेडची गरज नाही. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. अनेक जण बेडची गरज नसतांनाही केवळ घाबरल्यामुळे बेडसाठी आग्रह धरतात.

सगळ्याच रुग्णांना बेडची गरज नाही : डॉ. सैंदाणे 
कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असली तरी सरसकट सगळ्यांना बेडची गरज नाही. रेमडेसिव्हिरचा पर्याय सुचविला जात असल्याने त्यातून टंचाईचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वैद्यकीय विभागाने खासगी रुग्णालयांशी संपर्क साधून आता रेमडेसिव्हिर वापरासाठी विशिष्ट फॉर्म भरून घेत, रुग्णालयाकडून मागणीची पद्धत सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील विशेषाधिकारी प्रमुख डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली. जिल्हा वैद्यकीय विभागात मनुष्यबळही अपुरे आहे. सहाजिकच त्यामुळे जिल्‍ह्यात वैद्यकीय व्यवस्थेविरोधात आक्रोश वाढत आहे, या पार्श्वभूमीवर डॉ. सैंदाणे बोलत होते. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

खरोखरच ज्यांना बेडची गरज आहे, अशा रुग्णांना बेड देता येत नाही
डॉ. सैंदाणे म्हणाले, कोरोनाची संख्या लक्षणीय गतीने वाढत आहे. हे खरे आहे. पण सगळ्याच रुग्णांना बेडची गरज नाही. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. अनेक जण बेडची गरज नसतांनाही केवळ घाबरल्यामुळे बेडसाठी आग्रह धरतात. खरोखरच ज्यांना बेडची गरज आहे, अशा रुग्णांना बेड देता येत नाही. घाबरून चांगली स्थिती असलेल्या रुग्णांनी बेड अडविल्यामुळे बेडची टंचाईची स्थिती निर्माण होत आहे. त्यातच अपुरे मनुष्यबळ पण वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बेडची कमतरता निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. अनेक जणांनी पथ्य पाळून काळजी घेत, घरीच उपचार घेतले तरी, ते कोरोनातून बाहेर पडू शकतात. त्यामुळेच घाबरून जाण्याची गरज नाही. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ
रेमडेसिव्हरचा प्रोटोकॉल 
रेमडेसिव्हर इंजेक्शनसाठी रांगा हा सुद्धा घाबरण्यातून उद्भवणारा प्रकार आहे. रेमडेसिव्हरचा सरसकट प्रिस्क्रिप्शन दिले जात असल्याने घाबरलेले रुग्णांचे नातेवाईक शोधाशोध करून धावाधाव करतात. कोरोना उपचारासंदर्भात वैद्यकीय विभागाच्या प्रोटोकॉलनुसार गरज असलेल्या रुग्णांसाठी रेमडेसिव्हरचा उपयोग व्हायला हवा. मात्र सरसकट रेमडेसिव्हरचा पर्याय सुचविला जात असल्याने त्यातून टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not all patients need a bed Information of Doctors of District Hospital nashik marathi news