CoronaUpdate: जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रूग्णसंख्येत ३९१ ने घट; मृतांची संख्या सोळाशेपार 

अरुण मलाणी
Sunday, 18 October 2020

रविवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २२८, नाशिक ग्रामीणचे २१३, मालेगावचे नऊ तर, जिल्‍हाबाह्य सात रूग्‍णांचा समावेश आहे.

नाशिक : जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्‍णांची संख्या दुप्पटीहून अधिक राहिल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रूग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. रविवारी (ता. १८) दिवसभरात नव्‍याने ४५७ बाधित आढळले, तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांची संख्या ९३८ होती. दहा रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्णसंख्येत ३९१ ने घट झाली असून, सद्यस्‍थितीत जिल्ह्यात ६ हजार ६५६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्‍यान, जिल्ह्यातील मृतांची संख्या मात्र सोळाशे पार पोचली आहे. 

नाशिक ग्रामीणचे ५२७ रूग्‍ण कोरोनामुक्‍त

रविवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २२८, नाशिक ग्रामीणचे २१३, मालेगावचे नऊ तर, जिल्‍हाबाह्य सात रूग्‍णांचा समावेश आहे. तर, कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये सर्वाधिक ५२७ रूग्‍ण नाशिक ग्रामीणचे असून, शहरातील ३८१, मालेगावचे तीस रूग्‍ण आहेत. दहा मृतांमध्ये नाशिक शहरातील एक, नाशिक ग्रामीणच्‍या नऊ रूग्‍णांचा समावेश आहे. यातून एकूण बाधितांची संख्या ८९ हजार ३१८ झाली असून, यापैकी ८१ हजार ०६१ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका हद्द व गृहविलगीकरणात ७६८, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरण २६, मालेगाव रूग्‍णालये १२, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय रूग्‍णलयात दहा तर जिल्‍हा रूग्‍णालयात पाच संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ३९८ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक महापालिका हद्दीतील २३४ रूग्‍णांच्या अहवालांचा यात समावेश आहे. 

जिल्ह्यात १६०१ कोरोनाबळी 

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येने सोळाशेचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत नाशिक शहरातील सर्वाधिक ८३७ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, नाशिक ग्रामीणचे ५६५, मालेगावचे १६३ तर, जिल्‍हाबाह्य ३६ रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. त्यतून, जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १ हजार ६०१ झाली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of active patients in the district decreased by 391 nashik marathi news