नाशिक जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या ३ हजार; दिवसभरात ३४२ पॉझिटीव्‍ह

अरुण मलाणी
Sunday, 29 November 2020

रविवारी (ता.२९) आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १९९, नाशिक ग्रामीणमधील १२८, मालेगावच्‍या अकरा रूग्‍णांचा समावेश असून, जिल्‍हाबाहेरील चार रूग्‍णांचा अहवाल पॉझिटीव्‍ह आला आहे.

नाशिक : जिल्‍ह्‍यात उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या पुन्‍हा तीन हजारांच्‍या जवळ येऊन पोहोचली आहे. रविवारी (ता.२९) दिवसभरात ३४२ कोरोना बाधित आढळले असतांना, बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या २०७ होती. एका रूग्‍णाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत जिल्‍ह्‍यात १३४ ने वाढ झाली असून, सद्य स्‍थितीत २ हजार ९६६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

बाधितांमध्ये नाशिक शहरातील १९९

रविवारी (ता.२९) आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १९९, नाशिक ग्रामीणमधील १२८, मालेगावच्‍या अकरा रूग्‍णांचा समावेश असून, जिल्‍हाबाहेरील चार रूग्‍णांचा अहवाल पॉझिटीव्‍ह आला आहे. बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १०३, नाशिक ग्रामीणमधील ८९, मालेगावच्‍या ११ तर जिल्‍हाबाहेरील चार रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. नाशिक ग्रामीण भागातून नांदगाव येथील ५५ वर्षीय महिला रूग्‍णाची उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

एकूण संख्या १ लाख ७७०

यातून जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख ७७० झाली असून, यापैकी ९६ हजार ०१८ रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. १ हजार ७८६ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, २ हजार ९६६ रूग्‍ण उपचार घेत आहेत. दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ०२२, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ३३, मालेगाव क्षेत्रात सहा, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात २, जिल्‍हा रूग्‍णालयात पाच रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार २६९ रूग्णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ९५८ अहवाल नाशिक शहरातील रूग्‍णांचे असून, २६२ नाशिक ग्रामीण आणि मालेगाव क्षेत्रातील ४९ रूग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona patients in the district is close to 3 thousand nashik marathi news