धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

संतोष विंचु : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 29 जून 2020

घरातून रागाने, मित्राबरोबर जाण्याच्या हेतूने,कोणी फूस लावून तर कोणी विवाह करण्याच्या हेतूने....कारणे काहीही असोत पण महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहे. जिल्ह्यात महिन्याला सरासरी दीडशेच्या आसपास महिला बेपत्ता होत असून यातील बहुतांश महिलाचा शोध लागलेला नाही. 

नाशिक / येवला : घरातून रागाने, मित्राबरोबर जाण्याच्या हेतूने,कोणी फूस लावून तर कोणी विवाह करण्याच्या हेतूने....कारणे काहीही असोत पण महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहे. जिल्ह्यात महिन्याला सरासरी दीडशेच्या आसपास महिला बेपत्ता होत असून यातील बहुतांश महिलाचा शोध लागलेला नाही. 

महिलांचे हरवण्याचे प्रमाण जास्त

हरवत चाललेले कौटुंबिक संबध,पालक-मुलांतील संवादाचा अभाव,पती-पत्नीतील विसंवाद,कौटुंबिक ताणतणाव, तरुणाईत प्रेमाचे वाढलेले आकर्षण आदी गोष्टी यासाठी कारणीभूत असल्याचे दिसते. छोट्याश्‍या कारणाने मुला-मुलींचे घर सोडण्याचे प्रकार घडतात. शिवाय महिला-मुली अनेकदा प्रलोभनांनाही बळी पडून त्यात फसतात. अशा अनेक कारणांमुळेच महिलांचे हरवण्याचे प्रमाण जास्त आहे किंबहुना काही महिला तर एखादा रॅकेटच्या ही बळी पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यामुळे बेपत्ता झालेल्यांच्या तक्रारीत महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

पहिल्या दहा जिल्ह्यात नाशिकचा समाविष्ट
गंभीर म्हणजे 2016 ते 2018 या काळात देशात महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र देशातील टॉपचे राज्य राहिले आहे. 2018 मध्ये नाशिक जिल्ह्यातून 1011 महिला बेपत्ता झाल्याने पहिल्या दहा जिल्ह्यात नाशिकचा समाविष्ट होता. शहर व जिल्ह्यात 2014 ते 2017 या कालावधीत 2702 महिला व युवती बेपत्ता झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतरही हे आकडे वाढतच असून लॉकडाऊनच्या तीन महिन्यात सुद्धा नाशिक मधून सुमारे 400 महिला बेपत्ता झाल्या आहे.जिल्ह्यात महिन्याला सरासरी दीडशेच्या आसपास महिला बेपत्ता होत असून गेल्या सहा महिन्यात लॉकडाऊन असतानाही नाशिकमध्ये या काळात 1 हजार 226 जण बेपत्ता झाले. गंभीर म्हणजे यात 752 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यातील बहुतांश महिलाचा शोध लागलेला नाही

वर्षानुवर्षे बेपत्ताच

जानेवारी ते जून 2019 या सहाच महिन्यात जिल्ह्यातून 852 महिला बेपत्ता झाल्या होत्या. हाच आकडा आता 2020 मध्ये सर्व काही बंद असतांनाही 752 वर पोहोचला आहे. पोलिस यंत्रणेने अनेक महिलांचा शोध लावलाही आहे पण हरवलेल्या काही महिला मात्र वर्षानुवर्षे बेपत्ताच आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

नाशिक मधून बेपत्ता महिला... (जानेवारी ते जून या काळातील) 

पोलिस हद्द - वर्ष - 2019 - 2020 
नाशिक शहर - 396 - 313 
नाशिक ग्रामीण - 456 - 413 
----------------------- 
महाराष्ट्रातील बेपत्ता महिला.
वर्ष 2016 - 28316 
वर्ष 2017 - 29279 
वर्ष 2018 - 33964 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

"महिलांचा बेपत्ता होण्याचा विषय गंभीर आहे.कारणे काहीही असो पण परिस्थितीनुरूप ही वेळ येत असली तरी महिलांचे समुपदेशन करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील आकडे धक्कादायक असून महिला बेपत्ता होणार नाही यासाठी शासन स्तरावरूनच दखल घेण्याची गरज आहे." - नीलिमा पाटील,मालेगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half hundred women go missing nashik marathi news