सरासरी चौघांमागे एक पॉझिटिव्ह रुग्ण; रॅपिड तपासण्यांत कोरोना संशयिताचा शोध 

one in four people being tested turning corona positive in nashik marathi news
one in four people being tested turning corona positive in nashik marathi news

नाशिक : शहरात नगरसेवकांच्या पुढाकारातून प्रभागाप्रभागात सुरू असलेल्या कोरोना संशयित रुग्ण तपासणीत पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. 
अनेक ठिकाणी सरासरी चौघा रुग्णांमागे एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याचे चित्र आहे. सिडकोत नंतर शुक्रवारी (ता. ७) जेल रोडला लोखंडे मळ्यात हेच चित्र दिसले. विशेष म्हणजे, संसर्ग टाळण्यास मदत आणि पॉझिटिव्ह रुग्णाला उपचार घेऊन मात करणे शक्य होत असल्याने तपासण्यांना प्रतिसाद चांगला मिळतो आहे. 

सिडको परिसरात नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या कोरोना संशयित तपासणी मोहिमेत सरासरी चार रुग्णांमागे एक रुग्ण सापडत आहे. तसेच चित्र जेल रोडला दसक प्रभागातही दिसत आहे. सिडको, नाशिक रोड भागात दोन आठवड्यापासून नियमितपणे रॅपिड टेस्ट सुरू आहेत. त्यात, एकेका केंद्रावर रोज सरासरी ५० तपासण्या होतात. त्यात ८ ते १२ च्या दरम्यान पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याचे विविध भागातील नगरसेवकांचे म्हणणे आहे.

५० पैकी १० जण पॉझिटिव्ह

सायखेडा मार्गावरील लोखंडे मळ्यात भाजपचे नगरसेवक दिनकर आढाव यांच्या प्रभागात आठवडाभरापासून याच सरासरीने पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत.
शुक्रवारी झालेल्या तपासणीत ५० पैकी १० जण पॉझिटिव्ह सापडले. शनिवारी पुन्हा याच भागात तपासण्या होणार आहेत. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने संसर्ग टळत असल्याने आणि संबंधितांना उपचार घेऊन त्यावर मात करणे शक्य होत असल्याने तपासण्यांना सगळीकडे प्रतिसाद चांगला मिळतो आहे. 

सिडकोत २० जुलैपासून कोरोना चाचण्या सुरू आहेत. रोज सरासरी ५० ते ६० चाचण्यांत एकेका ठिकाणी १० ते १२ जण पॉझिटिव्ह सापडतात. याच सरासरीने आठवड्यापासून रुग्ण सापडत आहेत. 
-सुधाकर बडगुजर, नगरसेवक, शिवसेना


रिपोर्ट - विनोद बेदरकर
संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com