दोन दिवसांत कांदा भावात क्विंटलला सरासरी 'इतक्या' रुपयांची घसरण!

onion price.jpg
onion price.jpg
Updated on

नाशिक : कांद्याची निर्यात खुली होण्याचा मंगळवार (ता.17) हा तिसरा दिवस होता. निर्यात खुली होण्यापूर्वी सर्वसाधारणपणे दीड हजार ते एक हजार 750 रुपये क्विंटल भावाने विकल्या जाणाऱ्या कांद्याला अकराशे ते एक हजार 350 रुपये असा भाव मिळाला. दोन दिवसांत क्विंटलमागे सरासरी चारशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांना दहा कोटींचा दणका बसला. 

दुपटीहून अधिक कांदा विक्रीसाठी; त्यामुळे भाव गडगडले

निर्यात खुली झाल्यावर भाव स्थिरावण्यास मदत होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. सोमवारी (ता.16) शेतकऱ्यांनी दुपटीहून अधिक कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे भाव गडगडले. एकीकडे कांद्याची निर्यात सुरू असताना जागतिक बाजारपेठेतील कोरोना प्रादुर्भावामुळे ग्राहक मिळणे मुश्‍कील होईल, अशी धास्ती निर्यातदारांमध्ये आहे. दुसरीकडे भावातील घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कोल्हापूरमध्ये दीड हजार रुपयांवरून चौदाशे रुपये भाव मिळाला. मुंबईत सतराशे रुपये क्विंटल असा भाव स्थिर असला, तरीही पूर्वी एकोणीसशे रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला आहे. नागपूरमध्ये दोन हजार 25, पंढरपूरमध्ये एक हजार 251, पुण्यात एक हजार, औरंगाबादमध्ये अकराशे रुपये क्विंटल असा सरासरी भाव शेतकऱ्यांना मिळाला. पुण्यात निर्यातक्षम कांद्याची आवक सुरू असल्याने भाव कमी होणार नाहीत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली. 

कळवणमध्ये मोठी घसरण 

जिल्ह्यातील बाजारपेठांपैकी कळवणमध्ये कांद्याच्या भावात सर्वाधिक म्हणजे 650 रुपये क्विंटल अशी घसरण झाली. लासलगामध्ये 470, चांदवडमध्ये 355, मनमाडमध्ये 300, सटाण्यात 175, देवळ्यात 225, पिंपळगावमध्ये 309 रुपये क्विंटल अशी भावात घसरण झाली. भावाच्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी आवक नियंत्रणात ठेवावी, अशी सूचना सोशल मीडियातून बाजारपेठेचे अभ्यासक करत आहेत. 

कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

लासलगाव ----- तेराशे 
मुंगसे ----- बाराशे 
कळवण ----- अकराशे 
चांदवड ----- एक हजार 220 
मनमाड ----- एक हजार 150 
सटाणा ----- एक हजार 375 
देवळा ----- एक हजार 350 
उमराणे ----- एक हजार 450 
पिंपळगाव ----- एक हजार 201 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com