
शिरसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच दिवशी ४२ महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर गोंधळ उडाल्यानंतर आता प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान जिल्ह्यात या शस्त्रक्रिया करण्यासाठी केवळ बारा शल्यचिकित्सकांवर भार आहे. यामुळे भविष्यात शिरसागाव सारखी परिस्थिती उद्वभवू नये म्हणून शस्त्रक्रियाच्या नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी दिले आहेत.
नेमका प्रकार काय घडला?
शिरसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच दिवशी ४२ महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर येथील महिलांना कुठल्याही प्रकारची सुविधा न दिल्याने याप्रकरणी जि.प. सदस्या माळेकर यांनी तक्रार केल्यानंतर याप्रकरणी बनसोड यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजाविल्या. याप्रकरणी सपष्टीकरण देतांना बनसोड म्हणाल्या की, शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्यानंतर सदरची शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वत:हून महिला उपस्थित झाल्या. त्यांच्या समंतीने त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतू आरोग्य व्यवस्था पुरविण्यात विभाग मात्र असक्षम ठरला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता त्र्यंबकेश्वर आदिवासी तालुका असल्याने येथील आदिवासी लोक कामासाठी मोठ्या प्रमाणात स्थालांतर करतात. त्यामुळे शेतीच्या कामासाठी स्थालंतर करण्यापूर्वी डिसेंबर ते मार्च याकाळात मोठ्या प्रमाणात येथे शस्त्रक्रिया होत असल्याचा तीन वर्षाच्या आकडेवारी वरून दिसते.
हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल
शस्त्रक्रिया शिबिर पूर्व नियोजन करूनच
सदरची शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यात १२ सर्जन उपलब्ध असल्याने पुन्हा केव्हा शिबिर होईल याची माहिती नसल्याने शिरसगाव केंद्रात प्रकार घडला.
मात्र आता शिरसगाव केंद्रात जो प्रकार घडला तो प्रकार पुन्हा घडून नये म्हणून जिल्ह्यातील सर्जन यांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रयत्न केला जाईल असे यावेळी बनसोड यांनी सांगत जिल्ह्यातील सर्व आदिवासी तालुक्यात कुठल्या काळात सर्वाधिक शस्त्रक्रिया होतात. त्या दरम्यान कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पूर्व नियोजन करूनच आयोजित केले जाईल. तसेच शस्त्रक्रियानंतर आवश्यक ती सर्व साधनसामुग्री देखील त्याठिकाणी त्या महिला रूग्णांना दिली जाईल जेणेकरून अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये असेही सांगितले.
हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल