esakal | "शिक्काधारी रुग्णांना सक्तीचे क्वारंटाइन करणार"  
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal warn corona.jpg

नाशिक अद्याप "नो कोरोना' स्थितीत असल्याने नाशिकला साधारण 500 जणांना क्वारंटाइन करण्याची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. त्यात, तपोवन, बिटको रुग्णालय, सिडको, देवळाली कॅम्प येथील सॅनिटोरिअम यासह वेगवेगळ्या ठिकाणी रुग्ण क्वारंटाइन केले जाणार आहेत. नागरिकांनी 104 क्रमांकावर कोरोना संशयित रुग्णांबाबत माहिती कळविण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

"शिक्काधारी रुग्णांना सक्तीचे क्वारंटाइन करणार"  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर उपचार करून व हातावर शिक्के मारून घरातच क्वारंटाइन राहण्याच्या अटीवर सोडलेले कोरोना संशयित फिरताना आढळून आले आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना शासनातर्फे सक्तीने क्वारंटाइन केले जाईल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. स्वस्त धान्य दुकानांत एप्रिलसोबतच मे व जून महिन्याचे धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. 

पालकमंत्री भुजबळ : स्वस्त धान्य दुकानांत मे व जूनचेही धान्य 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भुजबळ यांनी गुरुवारी (ता. 19) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदी या वेळी उपस्थित होते. विदेशातून आलेल्या रुग्णांमुळे राज्यात संसर्ग पसरला आहे. त्यामुळे विदेशी नागरिकांना रोज विमानतळावरच क्वारंटाइन केले जाणार आहे. मात्र, यापूर्वी आलेल्या काही संशयितांना उपचारांनंतर घरीच क्वारंटाइन राहण्याची अट म्हणून, त्यांना हातावर शिक्के मारून सोडण्यात आले आहे. मात्र, असे रुग्ण सर्रास बाहेर फिरताना आढळून आल्याने अशा रुग्णांना सक्तीचे क्वारंटाइन केले जाणार आहे, तसेच गर्दीच्या एसटी बसस्थानकांत प्रवाशांचे स्क्रीनिंग, टेस्ट केली जाणार आहे. मास्क, सॅनिटायझरला अत्यावश्‍यक वस्तूंचा दर्जा देण्यात आला असून, अशा वस्तूंचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करून सात वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. 

पाचशे जण क्वारंटाइन करणार 
नाशिक अद्याप "नो कोरोना' स्थितीत असल्याने नाशिकला साधारण 500 जणांना क्वारंटाइन करण्याची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. त्यात, तपोवन, बिटको रुग्णालय, सिडको, देवळाली कॅम्प येथील सॅनिटोरिअम यासह वेगवेगळ्या ठिकाणी रुग्ण क्वारंटाइन केले जाणार आहेत. नागरिकांनी 104 क्रमांकावर कोरोना संशयित रुग्णांबाबत माहिती कळविण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

दोन महिन्यांचे आगाऊ धान्य 
दरम्यान, स्वस्त धान्य दुकानांत एप्रिलसोबतच मे व जून महिन्याचे धान्यही वाटप करण्यास सुरवात केली जाणार आहे. लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून धान्यवाटप करावे. लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्‍यकता राहणार नसल्याचेही श्री. भुजबळ यांनी सांगितले. 

हेही वाचा > धक्कादायक! आंघोळीसाठी 'तीघी' तलावात उतरल्या...अन् थोड्या वेळाने मृतदेहच पडले बाहेर..

जिल्ह्यात 178 विदेशी प्रवासी 
जिल्ह्यात आजमितीस विदेशातून आलेले 178 जण असल्याची माहिती असून, त्यांपैकी 149 जण प्रशासनाच्या निगराणीत आहेत. अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. विदेशातून आलेल्यांमध्ये यूएई- 65, इटली- 12, इराण- 13, सौदी अरब- 7, जर्मनी- 5, चीन- 5, अमेरिका- 8 व इतर देशांतून आलेल्या 75 जणांचा समावेश आहे.  

हेही वाचा > दहावीतला मुलगा पेपरच्या आदल्या दिवशीच मित्रासह पळाला....रेल्वे स्टेशनहून दोघांची खबर आली की..

go to top