esakal | संतापजनक! २० वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्यावर अत्याचार; प्राचार्य विरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

handicapped 2.jpg

फार्मसी महाविद्यालयात शिकणाऱ्या २० वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.

संतापजनक! २० वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्यावर अत्याचार; प्राचार्य विरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : येथील एआयटी फार्मसी महाविद्यालयात शिकणाऱ्या २० वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य नसीम कुरेशी याच्याविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.

मालेगावला दिव्यांग विद्यार्थ्यावर अत्याचार 

पीडित तरुण बुलडाणा जिल्ह्यातील आहे. तो सध्या फार्मसीनगरमध्ये राहतो. संशयित प्राचार्य कुरेशी याने त्याच्या दिव्यांगत्वाचा व गरिबीचा फायदा घेऊन ‘तुला जुने कपडे देतो’ असे आमिष दाखवून वेळोवेळी घरी बोलवून नापास करण्याची, महाविद्यालयातून काढून टाकण्याची आणि ठार करण्याची धमकी देत अनैसर्गिक कृत्य केले. फेब्रुवारी २०२० ते १३ मार्च २०२० या कालावधीत वेळोवेळी अत्याचार केल्याचे दिव्यांगाच्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात दिव्यांग तरुणाने बुधवारी (ता. १८) पोलिसांत तक्रार दाखल केली. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

पादचारी महिला ठार 
मालेगाव : महामार्गावरील वाके फाट्यावर रस्ता ओलांडणारी सुरेखा किरण शिंदे (वय ४०, रा. चिंचपाडा, जि. नंदुरबार, हल्ली रा. बारा बंगला, मालेगाव) यांना मोटारसायकल (एमएच १८, एएच ३३०३)ने जबर धडक दिली. अपघातात सुरेखा यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. १३ नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. फरारी मोटारसायकलचालकाविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

go to top