esakal | भय इथले कधी संपणार? नाशिकमध्ये विवाहितेसह चिमुरडीवर अत्याचार; भयंकर प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

woman cying.jpg

शहरात दोन वेगवेगळ्या घटनांत एका चिमुरडीसह विवाहितेवर अत्याचाराचे प्रकार उघडकीस आले आहे. याप्रकरणी आडगाव आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. 

भय इथले कधी संपणार? नाशिकमध्ये विवाहितेसह चिमुरडीवर अत्याचार; भयंकर प्रकार

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : शहरात दोन वेगवेगळ्या घटनांत एका चिमुरडीसह विवाहितेवर अत्याचाराचे प्रकार उघडकीस आले आहे. याप्रकरणी आडगाव आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. 

चिमुरडीच्या गुप्तांगावर नखे ओरबाडली
पहिल्या घटनेत ‘खाऊ देतो’ असे आमिष दाखवून ११ मार्चला दुपारी साडेतीनच्या सुमारास शेजारील व्यक्ती चारवर्षीय चिमुकलीस घरातून बाहेर घेऊन गेला व तिच्या गुप्तांगावर नखे ओरबाडत अत्याचार व मारहाण केली. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात पीडित बालिकेच्या आईने तक्रार दाखल केल्याने संशयितावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती आडगाव पोलिसांनी दिली. नांदूर नाका परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरी जाऊन संशयित भगतसिंग मोतीलाल लोदवाल या नराधमाने चारवर्षीय चिमुरडीला खाऊ देण्याचे आमिष दाखवत घराबाहेर नेले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर संशयित फरारी झाला. संबंधित बालिकेला त्रास झाल्याने तिने घरी प्रकार सांगताच तिच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक चांदणी पाटील तपास करत आहेत. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

दीड महिन्याची गर्भवती
दुसऱ्या घटनेत पतीला मारून टाकण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित गरोदर असून, सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पॉली शांतवन जाधव (वय ३०, रा. कॅनडा कॉर्नर) या संशयिताविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘तुझ्या पतीला मारून टाकील’, अशी धमकी देत संशयिताने जानेवारी २०१९ ते २० मार्च २०२१ दरम्यान पीडितेला कॅनडा कॉर्नर सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला असलेल्या पडीक खोलीत नेऊन अत्याचार व मारहाण केली. यातून पीडित महिला दीड महिन्याची गर्भवती राहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक प्रियंका गायकवाड तपास करत आहेत. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा