घरी येणार होता छोटासा पाहुणा...पण, काळ असा आला की सगळं हिरावून नेलं...

women dead in train journey.jpg
women dead in train journey.jpg

नाशिक : कल्याण येथून चाळीसगावला निघालेल्या विवाहितेची रेल्वेत तब्येत बिघडली. महिला गरोदर होती त्यात तीला अतिवेदना होत होत्या. उपचारासाठी तिला लासलगावला उतरवून उपचाराचा प्रयत्न झाला. मात्र, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. 

अशी आहे घटना

कल्याण येथून चाळीसगावला निघालेल्या विवाहितेची रेल्वेत तब्येत बिघडली. उपचारासाठी तिला लासलगावला उतरवून उपचाराचा प्रयत्न झाला. मात्र तिचा मृत्यू झाला. भाग्यश्री लहू गायकवाड (वय 22, कन्नड, जि. औरंगाबाद) ही गरोदर विवाहिता कल्याणहून चाळीसगावला जात असतांना दुपारी तिला रेल्वेत त्रास सुरू झाला. तिची तब्येत खूप बिघडल्याने तिला लासलगावजवळ उतरवून उपचारासाठी हलविण्यात आले. डॅाक्टरांनी वेळेत उपचार करुन देखील महिला वाचू शकली नाही. उपचारा दरम्यानच तिचा मृत्यू झाला. अवघ्या बावीस वर्षांच्या विवाहितेच्या मृत्यूने नातेवाइकांच्या आक्रोशाने जिल्हा रुग्णालयातील वातावरण हेलावून गेले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com