esakal | दिवाळीतही महिंद्रच्या 'थार'चे अविरत उत्पादन; औद्योगिक कामगारांची अशीही लवचिकता 
sakal

बोलून बातमी शोधा

thar mahindra.jpg

अनेक दशके कामगारांनी संघर्ष केला. कामगार हक्कांबाबत प्रथमपासून नाखूश असलेल्या चळवळींनी मराठी कामगार व त्यांच्या चळवळीवर कामचुकार, असे शिक्के मारून स्वस्तात मिळणाऱ्या परप्रांतीय कामगारांना पसंती देत प्रसंगी परप्रांतीयांचे गुन्हेगारीसह अनेक दोष झाकून कायम त्यांच्या कष्टाळूपणाचा डंका वाजविला.

दिवाळीतही महिंद्रच्या 'थार'चे अविरत उत्पादन; औद्योगिक कामगारांची अशीही लवचिकता 

sakal_logo
By
सतीश निकुंभ

सातपूर (जि.नाशिक) : मराठी कामगार कष्टाळू नसतात, अशी टीका करीत कायम परप्रांतीय कामगारांच्या कष्टाळूपणाचा डंका वाजवला जातो. कोरोनानंतर मात्र ही परिस्थिती बदलली आहे. बहुतांश परप्रांतीय दिवाळीत नसताना राज्यातील मराठी कामगार, अधिकाऱ्यांनी दिवाळी सुटी न घेता महिंद्रचे थार या गाडीचे उत्पादन अविरतपणे सुरू ठेवले. विशेष म्हणजे काही कामगार नेत्यांनी सुटीसाठी प्रयत्न केला, पण कामगारांनीच दिवाळीत सुटी न घेता उत्पादन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. 

राज्यातील औद्योगिक कामगारांची अशीही लवचिकता 
कामगारांना सण-उत्सवात किमान सुटी मिळावी यासाठी तत्कालीन कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आंदोलन करून कामगारांचे हक्क मिळविले. त्यानंतर कामगार कायदे तयार करून या सुविधा मिळविण्यासाठी लढा दिला. अनेक दशके कामगारांनी संघर्ष केला. कामगार हक्कांबाबत प्रथमपासून नाखूश असलेल्या चळवळींनी मराठी कामगार व त्यांच्या चळवळीवर कामचुकार, असे शिक्के मारून स्वस्तात मिळणाऱ्या परप्रांतीय कामगारांना पसंती देत प्रसंगी परप्रांतीयांचे गुन्हेगारीसह अनेक दोष झाकून कायम त्यांच्या कष्टाळूपणाचा डंका वाजविला.

सण-उत्सव विसरून कामात व्यस्त

औद्योगिक ठेकेदार व उद्योग संघटनाही मराठी कामगार काम करत नसल्याचे आरोप करत परप्रांतीय कामगारांना प्रोत्साहन देताना पदोपदी पाहायला मिळते. मात्र हा पारंपरिक समज खोटा ठरवीत नाशिकमधील कामगारांनी, तसेच कामगार संघटनांनी ऐन दिवाळीत लवचिकता दाखवीत सण सोडून उत्पादन सुरू ठेवले. कोरोनापूर्वीपासून पहिला दणका बसलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीला तोंड देणाऱ्या ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक कामगार सुट्या, सण-उत्सव विसरून कामात व्यस्त आहेत. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत
लॉकडाउननंतर सातपूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांत सकारात्मक कामकाज दिसत आहे. एबीबी कंपनीत उपाध्यक्ष गणेश कोठावदे व सीएटचे उपाध्यक्ष राजेंद्र कुमार दास आदींनी काम सुरू ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. पाठोपाठ दिवाळीत महिंद्रने उत्पादन सुरू ठेवल्यामुळे या कंपनीवर अवलंबून असलेल्या शेकडो व्हेंडर लघुउद्योगांनीही आपले काम सुरू ठेवले व या काळात कामावर असलेल्या कामगारांना काहींनी दीडपट पगारही देण्याची घोषणा केली आहे. या सकारात्मक बदलामुळे महाराष्ट्रातील अथवा स्थानिक कामगार काम करत नाही, असा आरोप काहीसा पुसला जाऊन नवीन गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी