'त्याची' एंट्री होताच...रात्री ग्रामस्थांनी चक्क फोडले फटाके..अन् मग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

रात्री अकराच्या सुमारास लोकवस्ती असलेल्या रमाबाई आंबेडकरनगर परिसरातील वडाचे झाड बस स्टॉप येथे तो फिरतांना दिसला. त्याला बघून मात्र सगळ्यांचा काळजाचा ठोकाच चुकला...संचारबंदीतही त्याचा असा मुक्तसंचार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातल्या त्यात तो दिसल्यानंतर चक्क नागरिकांनी फटाके फोडले.

नाशिक : (म्हसरूळ) रात्री अकराच्या सुमारास लोकवस्ती असलेल्या रमाबाई आंबेडकरनगर परिसरातील वडाचे झाड बस स्टॉप येथे तो फिरतांना दिसला. त्याला बघून मात्र सगळ्यांचा काळजाचा ठोकाच चुकला...संचारबंदीतही त्याचा असा मुक्तसंचार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातल्या त्यात तो दिसल्यानंतर चक्क नागरिकांनी फटाके फोडले. आता तर तो मळे परिसरातच नव्हे तर चक्क लोकवस्तीत मुक्तसंचार करत आहे. 

असा आहे प्रकार

म्हसरूळ येथील मळे परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. शुक्रवारी (ता. 8) रात्री अकराच्या सुमारास लोकवस्ती असलेल्या रमाबाई आंबेडकरनगर परिसरातील वडाचे झाड बस स्टॉप येथे बिबट्या आढळला. मळे परिसरात दिसणारा बिबट्या आता थेट लोकवस्तीच्या भागात दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. म्हसरूळ परिसरातील प्रभातनगर, वाढणे कॉलनी, वडाचे झाड बस स्टॉप परिसर व तेथील बागेत बिबट्या रात्री अकराच्या सुमारास आढळला. त्यानंतर रमाबाई आंबेडकरनगर येथील पुलाजवळून मोराडे मळ्यात शिरला. त्या भागात बिबट्या आल्याचे मोराडे वस्तीतील रहिवाशांना कळविण्यात आले. त्यांनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी फटाके वाजविले. आता बिबट्या मळे परिसरातच नव्हे तर चक्क लोकवस्तीत मुक्तसंचार करत आहे. 

हेही वाचा > रात्रीस खेळ चाले! 'इथं' कुंपनच खातंय शेत...ग्रामस्थांच्या चालाखीने पर्दाफाश

बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक बुरुंगे यांच्यासह नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपासून म्हसरूळ, वरवंडी रोडवर बिबट्याचे वास्तव्य आहे. पेठ रोडवरील नामको हॉस्पिटल परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार होत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 

हेही वाचा > PhotoGallery : ''आम्ही जातो आमुच्या गावा''...म्हणत मिळेल त्या मार्गाने 'ते' निघाले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramabai Ambedkarnagar Leopard sightings in the area nashik marathi news