esakal | ....तर शरद पवार पंतप्रधान झाले असते - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

raut and pawar.jpg

शरद पवारांच्या कर्तृत्वाची उत्तरेतील नेत्यांना भीती आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून शरद पवारांच्या मार्गात अडथळे आणले गेले. नरसिंहराव यांच्यावेळीच शरद पवार पंतप्रधान झाले असते. शरद पवार यापूर्वीच पंतप्रधान झाले पाहिजे होते

....तर शरद पवार पंतप्रधान झाले असते - संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्रातला नेता युपीएचा अध्यक्ष झाला, तर आनंदच..शरद पवारांच्या कर्तृत्वाची उत्तरेतील नेत्यांना भीती आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून शरद पवारांच्या मार्गात अडथळे आणले गेले. नरसिंहराव यांच्यावेळीच शरद पवार पंतप्रधान झाले असते. शरद पवार यापूर्वीच पंतप्रधान झाले पाहिजे होते .उत्तरेकडील नेत्यांच्या अडथळ्यांमुळे होऊ शकले नाहीत.असे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधत होते.

शेतकरी आंदोलन कुणीही हायजॅक केलेलं नाही

केंद्राला हवे तसे या संस्था काम करतात, त्यामुळे ईडी, सीबीआयची प्रतिमा मलिन झाली आहे, शेतकरी आंदोलन कुणीही हायजॅक केलेलं नाही, ते शेतकऱ्यांचंच आंदोलन.. तुम्ही कोणतीही हत्यारं वापरा, महाराष्ट्रातलं सरकार पडणार नाही आम्ही लढणारे आहोत. ते सर्व पंजाब, हरियाणाचे शेतकरीसरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडू शकलेलं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने एक पाऊल मागे घेतल्यास सरकारने शरणागती पत्करली असं होत नाही.ईडी, सिबीआय यांनी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागू नये. युपीएचं नेतृत्व कुणी करावं, यावर नेहमी चर्चा होत असते, मात्र निर्णय नाही. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण

आमचा विश्वास घटनेवर आहे

संविधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी तयार केलेलं नाही.कायदा बदलता येऊ शकतो.भाजपवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आमच्याकडे बांबू सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड ठरवणं, यात गैर काही नाही. राज्यपालांवर आमचा विश्वास नाही, आमचा विश्वास घटनेवर आहे असे राऊत म्हणाले

राज्यपालांचा सरकारमध्ये हस्तक्षेप नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाचाही घटनाबाह्य हस्तक्षेप सहन करत नाही
शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात असेल तर देशाचे संरक्षण मंत्री का गप्प बसलेत.सरकार पाकिस्तान आणि चीनवर सर्जिकल स्ट्राईक का करत नाही. केंद्राने महाराष्ट्राला मदत करावी.देशात जिथं भाजपचं सरकार नाही, तिथं केंद्र मदत करत नाही, हे बरोबर नाही .शरद पवार यापूर्वीच पंतप्रधान झाले पाहिजे होते .उत्तरेकडील नेत्यांच्या अडथळ्यांमुळे होऊ शकले नाहीत.