जावई आला दारू पिऊन घरी...अन् सासूसोबत केला धक्कादायक प्रकार.. 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 जानेवारी 2020

खाडे दारू पिऊन आला. त्याने पत्नी रेखा खाडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. डोक्‍यात कळशी मारण्याचा प्रयत्न केला. कलाबाई व त्यांची बहीण लीलाबाई या दोघी मध्यस्थी करण्यासाठी धावल्या. त्या वेळी याचा राग आल्याने आरोपी मच्छिंद्रने सासू लीलाबाई यांच्यासोबत धक्कादायक प्रकार केला.

नाशिक : खाडे दारू पिऊन आला. त्याने पत्नी रेखा खाडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. डोक्‍यात कळशी मारण्याचा प्रयत्न केला. कलाबाई व त्यांची बहीण लीलाबाई या दोघी मध्यस्थी करण्यासाठी धावल्या. त्या वेळी याचा राग आल्याने आरोपी मच्छिंद्रने सासू लीलाबाई यांच्यासोबत धक्कादायक प्रकार केला.

असा घडला प्रकार...

फिर्यादी कलाबाई माणिक खाडे (वय 60, रा. तरोडा, ता. नांदगाव) यांच्या फिर्यादीनुसार त्या विनयनगर परिसरात लग्नकार्यासाठी आल्या होत्या. आरोपी खाडे दारू पिऊन आला. त्याने पत्नी रेखा खाडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. डोक्‍यात कळशी मारण्याचा प्रयत्न केला. कलाबाई व त्यांची बहीण लीलाबाई या दोघी मध्यस्थी करण्यासाठी धावल्या. त्या वेळी याचा राग आल्याने आरोपी मच्छिंद्रने सासू लीलाबाई यांचा हात पिरगळत ढकलले व मावससासू कलाबाई यांना ठार करण्याची धमकी देत दगडी फरशी डोक्‍यात मारून ठार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मच्छिंद्रविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन खंदारे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला प्रधान न्यायाधीश अभय वाघवसे यांच्यासमोर चालला. ऍड. शिरीष कडवे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करीत कलाबाई यांच्यासह सात साक्षीदार तपासले. न्यायाधीश वाघवसे यांनी आरोपी मच्छिंद्रला चार महिने सक्तमजुरी व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पोलिस नाईक संतोष गोसावी, महिला पोलिस कर्मचारी व्ही. एम. सोनवणे यांनी पैरवी अधिकारी म्हणून पाठपुरावा केला. 

हेही वाचा > स्टाईलमध्ये लावली 'अशी' पैज...की होऊन बसला आयुष्याशी खेळ!

चार महिने सक्तमजुरी व 500 रुपये दंड

दारूच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्या जावयास समजावत असताना सासूच्या डोक्‍यात फरशी मारून जखमी केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपी जावयास चार महिने सक्तमजुरी व 500 रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी (ता. 14) ठोठावली. 17 एप्रिल 2018 ला विनयनगरमध्ये ही घटना घडली होती. 
मच्छिंद्र दामू घुगे (वय 42, रा. चंद्रकिरण अपार्टमेंट, विनयनगर) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा > शेजारचाच आवडत होता तिला...शेवटी पतीने..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son-in-law hitting Mother-in-law at Nashik Crime Marathi News