सलून व्यवसाय सुरू करण्याची सरकारची तयारी, पण...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. मात्र सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी नसल्यामुळे राज्य सरकारने सलून दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. मात्र, केंद्राने परवानगी दिल्यास राज्यात सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य शासनाची तयारी असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

छगन भुजबळ यांची माहिती, केंद्राकडून मिळावी परवानगी
नाशिक : 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. मात्र सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी नसल्यामुळे राज्य सरकारने सलून दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. मात्र, केंद्राने परवानगी दिल्यास राज्यात सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य शासनाची तयारी असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
  राष्ट्रीय नाभिक महासंघ संलग्न महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. 13) श्री. भुजबळ यांची भेट घेत निवेदन दिले. सलून व्यावसायिकांच्या प्रश्‍नाबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन श्री. भुजबळ यांनी दिले. या वेळी आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र नाभिक महासंघाचे पदाधिकारी नारायण यादव, अशोक सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, नाना वाघ, गणपत सोनवणे, ज्ञानेश्‍वर बोराडे, रमेश आहेर, संजय गायकवाड, विनोद गरुड, संतोष वाघ आदी उपस्थित होते. महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या परिस्थितीत गेल्या चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नाभिक समाज त्रस्त झाला असून, कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून नाभिक समाजाचे सलून व पार्लर सुरू करण्यास परवानगी द्यावी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Government is ready to open Saloon says Minister Chagan Bhujbal, Marathi News