BREAKING : चौदा वर्षात प्रथमच 'सुला फेस्ट' रद्द...संस्थापकांचा निर्णय!

sulafest3.jpg
sulafest3.jpg
Updated on

नाशिक : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परीस्थितीत संगीतप्रेमींच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने सुला विनियार्डस्‌चे संस्थापक व सीईओ राजीव सामंत यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामूळे संगीतप्रेमींना या अनोख्या संगीतमहोत्सवात सहभागी होण्यासाठी तब्बल वर्षभरातून अधिक कालावधीसाठी वाट पहावी लागणार आहे.

सुलाप्रेमींचा होणार हिरमोड

जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविलेला संगीत महोत्सव "सुला फेस्ट' आगामी वर्षी 2021 मध्ये होणार नसल्याची घोषणा सुला विनियार्डस्‌चे संस्थापक व सीईओ राजीव सामंत यांनी केली आहे. नाशिक येथील सुला विनियार्डस्‌च्या प्रांगणात सुला फेस्ट संगीत महोत्सव गेल्या फेब्रुवारी महिन्यात तेराव्या हंगामातील सुला फेस्ट पार पडला होता. या महोत्सवाच्या व्यासपीठावर युके स्थित हॉटचिप या बॅंडने भारतातील आपले सादरीकरण केले होते. तर सलीम-सुलेमानच्या जोडीनेही संगीतप्रेमींना आपल्या तालावर थिरकविले होते. वाईन निर्मितीत आघाडीचे नाव बसनलेल्या सुला विनियार्डस्‌ने या संगीत महोत्सवाला जागतिक स्तरावर लोकप्रिय बनविले होते. 2020 चा सुला फेस्ट बंगळूरू येथे होणार अशी प्रारंभी चर्चा रंगली होती. मात्र त्यास पूर्णविराम लावत हा महोत्सव नाशिकलाच होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले होते. फेब्रुवारीला झालेल्या या महोत्सवात जगभरातील संगीतप्रेमींनी हजेरी लावली होती. यानंतर मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा फैलाव होण्यास सुरवात झाली होती.

महोत्सवात खंड पडणार

दरवर्षी संगीतप्रेमींना उत्सुकता असलेला सुलाफेस्ट संगीत महोत्सव 2021 या आगामी वर्षात होणार नसल्याची घोषणा राजीव सामंत यांनी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जनजीवन विस्खळीत झालेले आहे. महोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता, सहभागींची सुरक्षिततेच्या अनुषंगाने महोत्सवाचे आयोजन केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामूळे गेल्या तेरा वर्षांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात आगामी वर्षात खंड पडणार आहे.

अनेक दिग्गजांचा राहिलाय सुलाफेस्टमध्ये सहभाग

सुलाफेस्टच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलावंतांचे सादरीकरण झालेले आहे. यात गेल्यावर्षी संगीतकार सलीम-सुलेमान यांच्या जोडीने सादरीकरण केले होते. याशिवाय कैलास खेर, लकी अली, शंकर महादेवन, अमित त्रिवेदी अशा दिग्गज संगीतकार, गायक, कलावंतांनी या व्यासपीठावर आपल्या संगीताच्या तालावर संगीतप्रेमींना थिरकविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com