esakal | धक्कादायक! "चोर सोडून संन्याशालाच फाशी..! इथे पोलिसांचा कारभारच अजब..
sakal

बोलून बातमी शोधा

police nashik.jpg

कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे.मात्र जायखेडा (ता. बागलाण) येथील मोसम नदी पात्रातून अवैध वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.यामुळे वाळू माफियांची दादागिरीही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर 'चोर सोडून संन्याशाला फाशी' देण्याचा हा धक्कादायक प्रकार घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहेत.

धक्कादायक! "चोर सोडून संन्याशालाच फाशी..! इथे पोलिसांचा कारभारच अजब..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / जायखेडा : सध्या कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे.मात्र जायखेडा (ता. बागलाण) येथील मोसम नदी पात्रातून अवैध वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.यामुळे वाळू माफियांची दादागिरीही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर 'चोर सोडून संन्याशाला फाशी' देण्याचा हा धक्कादायक प्रकार घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहेत.

असा घडला प्रकार

जायखेडा परिसरातील मोसम नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरुटी वाहतूक सुरु आहे. रात्री मोटार सायकल,ट्रॅक्टरद्वारे वाळू तस्करी केली जात आहे.यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेली शासकीय यंत्रणा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अतिरिक्त कामात अडकली आहे. याचाच गैरफायदा घेत वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. कुठलेही भांडवल न अडकवता भरमसाठ पैसा मिळून देणारा धंदा म्हणून गुंड प्रवृत्तीचे लोक या धंद्यात उतरले आहेत.साम,दाम,दंड,भेद वापरून राजरोस हा उद्योग केला जात आहे.कोणी विरोध करण्याची हिंमत करू नये,यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही केला जात आहे.नागरिकांनी वाळू चोरी विरोधात आवाज उठवताच महसूल विभाग व पोलिसांनी वेळोवेळी कारवायाही केल्या आहेत.परंतु तरीही कायद्याचा कुठलाही धाक न बाळगता तस्करांकडून वाळू चोरी सुरूच आहे.हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे हे शोधण्याची गरज आहे.याआधीही दोन महिन्यांपूर्वी मध्य रात्रीच्यासुमारास मोसम नदी पात्रातून चोरटी वाळूची वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या वाडीपिसोळचे पोलीस पाटील व सरपंचावर वाळू तस्करांनी दगडफेक करून दोघांना जखमी करण्याचा व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.याचीच पुनरावृत्ती पुन्हा जायखेडा येथे घडली आहे.मोसम नदी पात्रातून रात्री होत असलेली वाळूची चोरी रोखणाऱ्या तरूणांना वाळु तस्करांच्या दमबाजीचा व मदतीसाठी बोलावलेल्या पोलिसांच्या असहकार्याचा सामना करावा लागला.या संदर्भात विविध माध्यमातून आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी नोटीस पाठवून जाब विचारला आहे. 

ही हुकूमशाही असून,लोकशाहीत हे सहन केले जाणार नाही.
जायखेडा पोलिसांनी सामजिक कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.ही हुकूमशाही असून,लोकशाहीत हे सहन केले जाणार नाही.यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे ग्रहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ,खासदार डॉ.सुभाष भामरे,आमदार दिलिप बोरसे,पोलीस अधीक्षक नाशिक, जिल्हधिकारी नाशिक,तहसीलदार बागलाण आदींकडे तक्रार करण्यात येईल,असे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गोसावी यांनी सांगितले.

हेही वाचा > मालेगावच्या रुग्णाचा व्हॉटसऍपने लागला शोध.. समजले तेव्हा कुटुंबियांना धक्का! 

यापुढेही वाळू माफियांवर कडक कारवाई
या वर्षांमध्ये जानेवारीपासून वाळूच्या पाच कारवाया तहसील कार्यालयामार्फत झालेल्या आहेत. वाळू चोरी होऊ नये म्हणून नदीमधून बाहेर निघण्याच्या ठिकाणी जेसीबी मशिनच्या सहाय्याने साऱ्या मारण्यात आलेल्या आहेत.यात एका वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यांमध्ये संबंधित वाळूमाफियाला तुरुंगवासही झालेला आहे.यापुढेही वाळू माफियांवर कडक कार्यवाही करण्यात येईल.- जितेंद्र इंगळे,तहसीलदार बागलाण  

go to top