esakal | नको उधळपट्टी..नको श्रीमंतीचा थाट..पठ्ठ्याची बघा अनोखी वरात!
sakal

बोलून बातमी शोधा

सौंदाणे : बैलगाडीतून वऱ्हाडींसह घरी परतताना योगेश खैरनार व ज्योती खैरनार. 

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात कानबाई मातेच्या कार्यक्रमात सामूहिक विवाह होत. ​सध्या ग्रामीण भागात सर्वत्र कोरोनाचा प्रभाव अधिक प्रमाणात असला तरी ग्रामीण भागात सामाजिक अंतर ठेवण्याच्या प्रयत्नाचा संदेश नवीन दांपत्याकडून देण्याच्या प्रयत्नांचे दर्शन घडून आले आहे. ​

नको उधळपट्टी..नको श्रीमंतीचा थाट..पठ्ठ्याची बघा अनोखी वरात!

sakal_logo
By
प्रशांत पवार

नाशिक / सौंदाणे : अलीकडच्या काळात लग्नसमारंभ म्हणजे उधळपट्टी आणि श्रीमंतीचा थाट दाखविण्याचा एक सोहळा बनलेला आहे. दिवसेंदिवस या माध्यमातून लाखोंची उलाढाल बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीत या पठ्ठ्याने तर आगळीवेगळी वरात काढली. 

लग्नसोहळ्यात लेटेस्ट ट्रेंड निराळे
लग्नसोहळ्यात लेटेस्ट ट्रेंड नेहमीच बघितले असतील. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सौंदाणे (ता. मालेगाव) येथील उच्चशिक्षित मुलाने बैलगाडीतून वरात काढत मातीशी असलेली नाळ त्यांच्या आजच्या कृतीतून दाखवून दिली आहे. या पठ्ठ्याने वरात तर काढली पण त्यासाठी घोडागाडी वा मोटारगाडी ऐवजी थेट बैलगाडीच हाकली.आपल्या लग्नाची वरात बैलगाडीतून काढण्याचा एक आगळावेगळा निर्णय घेतला आणि सौंदाणेकरांना बैलगाडीच्या वरातीचे एक सुखद दर्शन झाले.


नवदाम्पत्याचा उपयुक्त संदेश
सौंदाणे येथील योगेश खैरनार व ज्योती भालेकर यांचा विवाह लॉकडाउनचे नियम पाळत येथील सारजाई लॉन्स येथे गुरुवारी (ता. ३१) पार पडला. नवीन दांपत्याने आपली वरात लॉन्स ते घर अशी बैलगाडीतून काढली. सध्या ग्रामीण भागात सर्वत्र कोरोनाचा प्रभाव अधिक प्रमाणात असला तरी ग्रामीण भागात सामाजिक अंतर ठेवण्याच्या प्रयत्नाचा संदेश नवीन दांपत्याकडून देण्याच्या प्रयत्नांचे दर्शन घडून आले आहे. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात कानबाई मातेच्या कार्यक्रमात सामूहिक विवाह होत. विवाहासाठी संपूर्ण वऱ्हाडी मंडळी बैलगाडीतूनच प्रवास करीत असत, सध्या चालू असलेल्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात पूर्वीच्या ५० वर्षांपूर्वीचे चित्र ग्रामीण भागातील जनतेस बघावयास मिळाले असून, याचा सुखद अनुभव ग्रामीण भागातील जनतेला घेता आला. 
 

बळीराजाप्रति कृतज्ञता व्यक्त
जुने ते सोने याप्रमाणे जुने दिवस आम्ही बघितले व अनुभवले परंतु येणाऱ्या भावी पिढीला हे दिवस पाहावयास व अनुभवास मिळावेत यासाठी हा छोटासा प्रयत्न होता. या प्रसंगामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. -बाळूबाबा खैरनार, वरपिता, सौंदाणे 

संपादन - ज्योती देवरे