आरोग्यविमा नसलेल्यांना 'या' पॉलिसीमुळे मिळणार दिलासा..! 

policy.jpg
policy.jpg

नाशिक : देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, उपचाराच्या खर्चासाठी लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर विमा नियामक व विकास प्राधिकरण (आयआरडीए)ने सर्व विमा कंपन्यांना कोरोनाकवच व कोरोनासुरक्षा पॉलिसीचे निर्देश दिले आहेत. आयआरडीएच्या आदेशानुसार विमा कंपन्यांना 10 जुलैपासून ग्राहकांसाठी या पॉलिसी उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. सर्व हेल्थ व जनरल इन्शुरन्स कंपन्यांना कोरोनाकवच पॉलिसी अनिवार्य केली आहे. 

आणि इतर खर्च यात समाविष्ट
कोरोनाकवच पॉलिसींतर्गत कोविड-19 शी संबंधित पाच लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च मिळेल. या आजारात वापरण्यात येणारी पीपीई किट, ग्लोव्हज, मास्क आणि इतर खर्च यात समाविष्ट असेल. रुग्णालयाऐवजी घरीच उपचार होत असल्यास 14 दिवसांच्या उपचाराचा खर्च गृहीत धरला जाईल. पॉलिसी कशी विकावी याचे विमा कंपनीला पूर्ण स्वातंत्र्य असेल. मात्र, सर्व विमा कंपन्यांचा प्रीमियम वेगवेगळा असला, तरी देशात तो सर्वत्र सारखाच असेल. क्षेत्रनिहाय त्याची विभागणी होणार नाही. 

कोरोनाकवच पॉलिसी कुणी घ्यावी? 
ज्यांच्याकडे आरोग्यविमा नाही असे लोक ही पॉलिसी घेऊ शकतात, ज्यामुळे कोविड-19 वरील उपचाराच्या खर्चासाठी तिचा उपयोग होऊ शकेल. तसेच कमी रकमेचा आरोग्यविमा असेल तेसुद्धा ही पॉलिसी घेऊ शकतात. ज्यांच्याकडे आरोग्यविमा आहे आणि तो जर कोविड-19 शी संबंधित आजार कव्हर करत असेल तर त्यांना ही पॉलिसी घेण्याची गरज नाही. त्यामुळे विमाधारकांनी आपल्या आधीच्या आरोग्यविम्यात ही सुविधा उपलब्ध आहे की नाही याची विमा कंपनीकडे खात्री करून घ्यायला हवी. 

हेही वाचा > भयंकर..आमरस खाण्यासाठी नाशिकच्या पाहुण्यांना खास निमंत्रण..अन् तिथेच झाला घात..! गावात दहशत..

कोरोनाकवच पॉलिसीची वैशिष्ट्ये 
-कोविड-19 शी संबंधित वैद्यकीय गरजांची पूर्ती. 
-एका विमा कंपनीतून दुसरीमध्ये पोर्टेबिलिटीची सुविधा. 
-18 ते 65 वयाची मर्यादा. 
-तीन महिने ते 25 वर्षांपर्यंत अवलंबित मुलांचा समावेश. 
-संपूर्ण कुटुंबाला समाविष्ट करण्याचा पर्याय उपलब्ध. 
-कमीत कमी 50 हजार आणि जास्तीत जास्त पाच लाखांचा विमा. 
-पॉलिसीचा कालावधी 3.5 ते 9.5 महिन्यांदरम्यानचा. निवडलेल्या कालावधीनुसार नूतनीकरण गरजेचे. 

कोरोनारक्षक पॉलिसीची वैशिष्ट्ये 
-व्यक्तिगत पॉलिसी. 
-18 ते 65 वयाची मर्यादा. 
-संपूर्ण कुटुंबाला समाविष्ट करण्याचा पर्याय नाही. 
-कमीत कमी 50 हजार आणि जास्तीत जास्त अडीच लाखांचा विमा. 
-रुग्ण कोरोनाग्रस्त आढळल्यास कमीत कमी 72 तास रुग्णालयात दाखल असावा. विम्याची पूर्ण रक्कम एकरकमी मिळणार.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com