esakal | एसटीला दिवाळी पावली! पाच दिवसात पावणे तीन कोटी उत्पन्न 
sakal

बोलून बातमी शोधा

st 2.jpg

कोरोना काळात प्रभावित झालेल्या लालपरीची चाके दिवाळीनिमित्त गतीमान झाल्याचे बघायला मिळते आहे. प्रवाश्‍यांच्या सेवार्थ जादा बसगाड्या उपलब्ध करून देतांना, महामंडळालाही यंदाच्या हंगामात भरीव उत्पन्न मिळाले आहे. गेल्या पाच दिवसांत नाशिक महामंडळाच्या तिजोरीत सुमारे पावणे तीन कोटी रूपयांचे उत्पन्न जमले आहे. 

एसटीला दिवाळी पावली! पाच दिवसात पावणे तीन कोटी उत्पन्न 

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : कोरोना काळात प्रभावित झालेल्या लालपरीची चाके दिवाळीनिमित्त गतीमान झाल्याचे बघायला मिळते आहे. प्रवाश्‍यांच्या सेवार्थ जादा बसगाड्या उपलब्ध करून देतांना, महामंडळालाही यंदाच्या हंगामात भरीव उत्पन्न मिळाले आहे. गेल्या पाच दिवसांत नाशिक महामंडळाच्या तिजोरीत सुमारे पावणे तीन कोटी रूपयांचे उत्पन्न जमले आहे. 

काही दिवस बसगाड्यांमध्ये अशीच गर्दी

गेल्या काही दिवसांपासून दिवाळी हंगामानिमित्त नियमित वेळापत्रका व्यतिरिक्‍त जागा बसगाड्या सोडल्या जात आहेत. गेल्या १३ ते १७ नोव्हेंबर अशा पाच दिवसांत महामंडळाच्या बसगाड्यांना विक्रमी गर्दी होती. माहेरवासीनींकडून परतीचा प्रवास अद्यापही सुरू असल्याने आगामी काही दिवस अशीच गर्दी बसगाड्यांमध्ये बघायला मिळेल. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

आगामी काळात वेतनासह अन्य बाबींचे प्रश्‍न मार्गी
दरम्यान गेल्या पाच दिवसांत एसटी महामंडळातर्फे २ हजार ६०५ फेऱ्या झाल्या असून, यातून नाशिक कार्यालयास २ कोटी ६८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोना काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने महामंडळाचे उत्पन्न पूर्णपणे थांबले होते. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारापासून अन्य समस्या आणखी गंभीर झाल्या होत्या. दिवाळीत भरघोस उत्पन्न झालेले असल्याने आगामी काळात वेतनासह अन्य बाबींचे प्रश्‍न मार्गी लागली असा अंदाज व्यक्‍त होत आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

एसटीच्या तिजोरीत पुन्हा भर
दरम्यान दिवाळीच्या हंगामात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता महामंडळातर्फे जादा बसगाड्यांची सुविधा उपलब्ध केली होती. बसस्थानकांवर विद्युत रोषणाईदेखील केलेली होती. प्रवाश्‍यांनी एसटीच्या सेवेला प्रतिसाद देत लालपरीने एच्छिक स्थळी प्रवास करतांना एसटीच्या तिजोरीत पुन्हा भर घातली आहे. 


गेल्या तीन दिवसांत 
महामंडळाला मिळालेले उत्पन्न 
१५ नोव्हेंबर----------५९ लाख ०३ हजार 
१६ नोव्हेंबर----------६४ लाख ९० हजार 
१७ नोव्हेंबर----------६४ लाख २५ हजार