ह्रदयद्रावक! कुणीतरी वाचवा हो, माझ्या बाळाला!...काळजाच्या तुकड्याला रक्ताच्या थारोळ्यात बघून मातेचा आक्रोश..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

माझ्या मुलाला वाचवा हो... तो त्या घेऊन जातोय... त्या मातेच्या डोळ्यासमोरच सगळं घडतं होतं. लेकराला त्या अवस्थेत बघत तिच्या ह्रदयावर वारच होत होते जणू...लोक मदतीला आले देखील पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. आपल्या चिमुकल्याला रक्ताच्या थारोळ्यात बघतांना त्या मातेला मरण यातना होत होत्या.  ही ह्रदय हेलावणारी घटना घडली देवळाली कॅम्प येथील दोनवाडे गाव येथे...

नाशिक : (देवळाली कॅम्प) माझ्या मुलाला वाचवा हो... तो त्या घेऊन जातोय... त्या मातेच्या डोळ्यासमोरच सगळं घडतं होतं. लेकराला त्या अवस्थेत बघत तिच्या ह्रदयावर वारच होत होते जणू...लोक मदतीला आले देखील पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. आपल्या चिमुकल्याला रक्ताच्या थारोळ्यात बघतांना त्या मातेला मरण यातना होत होत्या.  ही ह्रदय हेलावणारी घटना घडली देवळाली कॅम्प येथील दोनवाडे गाव येथे...

अशी आहे घटना

भगूर जवळील दोनवाडे गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका तीन वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान दोनवाडे गावातील पप्पू शिरोळे यांच्या मळ्यालगतच्या वस्तीवर ही घटना घडली. शुक्रवार (ता.1) सायंकाळी या वस्तीवरील रुद्र राजू शिरोळे हा तीन वर्षीय चिमुकला घराच्या ओट्यावर खेळत असताना बिबट्याने झडप घालून शेजारच्या ऊसाच्या शेतात घेऊन गेला.

हेही वाचा > हूश्श! नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास...अखेर 'त्या' नोटाचं उकललं गूढ

शिरोळे परिवाराने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी शेतात धाव घेतली. परंतु बिबट्याच्या हल्ल्यात रुद्रचा मृत्यू झाला होता. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा > धक्कादायक! चक्क डॉक्टरकडूनच परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची खोटी माहीती?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three years old boy killed in leopard attack in deolali camp nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: