esakal | VIDEO : जावईबापू म्हणतात.."मी गाढवावरून मिरवणार..सगळ्यांचीच जिरवणार" "शंभर वर्षांची प्रथा आहे हो!"
sakal

बोलून बातमी शोधा

dhind.jpg

चेहरा काळा करून लसणा-मिरचीची मुंडावळी बांधून कांदे, बटाटे, टायर, चप्पल बुटाचे हार घालून जावईबापूंना गाढवावर बसविण्यात येते. गावात वाद्याच्या गजरात या स्वारीला गाढवावर बसून फिरवले जाते. सारे त्यांची टिंगलटवाळी करतात, टर उडवतात. रंगरूपी अक्षतांचा त्यांच्यावर गल्लोगल्ली वर्षाव करतात.

VIDEO : जावईबापू म्हणतात.."मी गाढवावरून मिरवणार..सगळ्यांचीच जिरवणार" "शंभर वर्षांची प्रथा आहे हो!"

sakal_logo
By
राजेंद्र अंकार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (सिन्नर) ब्रिटिश राजवटीत सुरू झालेली व 100 वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या जावयाच्या धिंडीच्या प्रथेसाठी वडांगळीकर सज्ज झाले होते. धूलिवंदन ते रंगपंचमीदरम्यान वडांगळीकर जावयाची गाढवावरून धिंड काढतात. मात्र ऐनवेळी जावई मिळत नसल्याने कोणत्याही परिस्थितीत जावयाचा शोध घेऊन रंगपंचमीला धिंड काढायचीच, असा चंग येथील युवकांनी बांधला अन् वडांगळीत जावई मिळवलाच..!

प्रथा-परंपरा या वर्षीही जपण्यासाठी जावयाबरोबरच गाढवाचाही शोध

ज्या गावातून नवरदेव होऊन सजून, वाजतगाजत घोड्यावरून ऐटीत मिरवले जाते, त्याच गावात जावयाला गाढवावरून मिरविण्याची वडांगळीकरांची फार जुनी प्रथा आहे. चेहरा काळा करून लसणा-मिरचीची मुंडावळी बांधून कांदे, बटाटे, टायर, चप्पल बुटाचे हार घालून जावईबापूंना गाढवावर बसविण्यात येते. गावात वाद्याच्या गजरात या स्वारीला गाढवावर बसून फिरवले जाते. सारे त्यांची टिंगलटवाळी करतात, टर उडवतात. रंगरूपी अक्षतांचा त्यांच्यावर गल्लोगल्ली वर्षाव करतात. नंतर त्याच जावयाला आंघोळ घालून (नवरदेवासारखे) सुवासिनींच्या हस्ते नवी वस्त्रे परिधान करून आदराने चहापान, नाष्टा, सुग्रास भोजन देऊन निरोप दिला जातो. ग्रामस्थ विशेष करून तरुणवर्ग आपली ही प्रथा-परंपरा या वर्षीही जपण्यासाठी जावयाबरोबरच गाढवाचाही शोध घेत आहेत. 

स्थायिक झालेल्यांनाही जावयाचा मान देत त्यांची धिंड काढण्याची परंपरा

रंगपंचमीला निश्‍चित जावई सापडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. गावात समृद्धी यावी, आरोग्य चांगले राहावे, दुष्काळ पडू नये व जावयाचीही भरभराट व्हावी, अशी भावना धिंड काढण्यामागे आहे. जावई न मिळाल्यास नोकरी- व्यवसायानिमित्त वडांगळीत स्थायिक झालेल्यांनाही जावयाचा मान देत त्यांची धिंड काढण्याची परंपरा ग्रामस्थांनी जोपासली आहे. इंग्रज अधिकारी, शिक्षक, व्यापारी आदींनाही जावयाप्रमाणे धिंडीचा मान मिळाला आहे. 

हेही वाचा > तुमच्या मोबाईलमध्ये ही आता कोरोना?...कॉल करुन तर पाहा

जावयांनी फिरवली वडांगळीकडे पाठ... 

नुकताच वडांगळीत आपला व्यवसाय सुरू करणारे जावई धिंडीसाठी आयतेच सावज सापडल्याचे वडांगळीकरांना वाटत असतानाचा या धिंडीची कुणकूण या जावईबापूंना लागली आणि त्यांनी धूलिवंदनपासून वडांगळीकडे पाठ फिरवली असून, रंगपंचमी होईपर्यंत वडांगळीत पाय न ठेवण्याची शपथ घेतली होती. 

हेही वाचा > VIDEO : 'ते' आले...'त्यांनी' पाहिलं, 'ते' रंगात रंगले...अन् जिंकली मने!

go to top