सत्तावीस लाखावर डल्ला...पण जीपीएसने केला घात! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

महामार्गावरून जाणाऱ्या डांबराच्या ट्रकला अडवत त्यांनी सत्तावीस लाखावर डल्ला मारला खरा मात्र त्या वाहनावर असणाऱ्या जीपीएसने त्यांचा घात केला आणि ते अलगद पोलीसांच्या जाळ्यात सापड़ले कसे ते वाचा..... 

नाशिक / मालेगाव : महामार्गावरून जाणाऱ्या डांबराच्या ट्रकला अडवत त्यांनी सत्तावीस लाखावर डल्ला मारला खरा मात्र त्या वाहनावर असणाऱ्या जीपीएसने त्यांचा घात केला आणि ते अलगद पोलीसांच्या जाळ्यात सापड़ले कसे ते वाचा..... 

साडेसत्तावीस लाखांचा ऐवज लुटला
चिखलओहोळ शिवारात सफेद कारमधून (एमएच 01, सीव्ही 9951) आलेल्या चौघांनी उत्तर प्रदेशातील नवनीत रोड लाइन्सचा 20 लाखांचा टॅंकर (जीजे 06, बीटी 0327) चालकाला जबरदस्तीने खाली उतरवून पळवून नेला होता. चालक अवधेशकुमार सरोज (वय 32, रा. बहुरियापूर, उत्तर प्रदेश) याच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. चोरट्यांनी 27 टन डांबर भरलेला टॅंकर, सात लाख 36 हजारांचे डांबरासह चालकाच्या खिशातील तीन हजारांची रोकड व दोन मोबाईल असा साडेसत्तावीस लाखांचा ऐवज लुटला होता. 

जीपीएसच्या आधारे पकडले

चिखलओहोळ शिवारातून पाच दिवसांपूर्वी डांबर भरलेला टॅंकर, चालकाची रोकड, मोबाईल असा सुमारे साडेसत्तावीस लाखांचा ऐवज लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला तालुका पोलिसांनी मुंबईतून अटक केली. डांबर टॅंकर चोरी करून डांबरची परस्पर विक्री करण्याचा संशयितांचा प्रयत्न होता. शनिवारी (ता. 20) टॅंकर चोरी झाल्यानंतर जीपीएसच्या आधारे पोलिसांनी रविवारी (ता. 21) जळगाव-पारोळा रस्त्यावरून संबंधित टॅंकर ताब्यात घेतला. कारच्या क्रमांकावरून शोध घेत पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या. 

हेही वाचा > सावध व्हा...'हा' आजार पडेल महागात...कोरोनाचे व्हाल बळी!

पोलिसांनी संशयितांना अटक केली. 
सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक संदीप ठाकरे, पोलिस नाईक शैलेश बच्छाव, पन्नालाल बागूल, स्वप्नील पवार आदींनी मुंबईतून मजहर खान सलीम, आसिफ खान जैनुद्दीन, मोहंमदइझरार अल्लन अली, मोहंमद अश्रफ मोहंमद अस्लम, इनामुल हसन मोहंमद मोबीन (सर्व मूळ रा. राणीगंज, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश, हल्ली ऍन्टॉप हील वडाळा, मुंबई) यांना अटक केली. यातील दोघे कारचालक आहेत. कार मुंबई येथील खान टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्सच्या नावाने नोंदणी केली होती. कारची चौकशी करून पोलिसांनी संशयितांना अटक केली. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सकाळी हसतमुख दिसलेल्या लेकीची दुपारी डेडबॉडीच...आईने फोडला हंबरडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty-seven lakhs robbery but GPS failed plan nashik marathi news