नाशिक जिल्ह्यात दोन लाख कोमॉर्बिड रुग्णांची होणार फेरतपासणी 

महेंद्र महाजन
Thursday, 3 December 2020

शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरले असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दुर्धर आजार आणि ज्येष्ठांचा समावेश असलेल्या कोमॉर्बिड रुग्णांवर लक्ष केंद्रित करीत, ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी‘ अभियानांतर्गत तपासणी केली होती. आता पुन्हा आरोग्य विभाग यासर्व दोन लाख नऊ हजार ६५९ कोमॉर्बिड रुग्णांची तपासणी करणार आहे. 

नाशिक : शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरले असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दुर्धर आजार आणि ज्येष्ठांचा समावेश असलेल्या कोमॉर्बिड रुग्णांवर लक्ष केंद्रित करीत, ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी‘ अभियानांतर्गत तपासणी केली होती. आता पुन्हा आरोग्य विभाग यासर्व दोन लाख नऊ हजार ६५९ कोमॉर्बिड रुग्णांची तपासणी करणार आहे. 

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’

कोरोना विषाणू संसर्गामध्ये मृत्यूचे प्रमाण पहिल्या टप्प्यात अधिक होते. त्या वेळी दुर्धर आजार आणि ज्येष्ठांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून कोमॉर्बिड रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष देण्यात आले होते. जिल्ह्यात हा उपक्रम राबविला गेल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी ते अनेक उपाययोजनांमध्ये पूरक ठरले आहे. त्यामुळे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ हे अभियान जाहीर झाल्यावर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या यंत्रणेला पूर्वतयारीची मदत झाली होती. कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याबद्दल अंदाज वर्तविले जात असताना कोमॉर्बिड रुग्णांचे आरोग्य राखणे महत्त्वाचे झाले असल्याने आरोग्य विभागाने पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येकाचे तापमान, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण याच्या नोंदी केल्या जातील. तसेच प्रत्येकाशी संपर्क राहील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

तालुकानिहाय कोमॉर्बिड रुग्णांची संख्या 
(दोन फेऱ्यांमध्ये झालेल्या नोंदीचे आकडे आहेत.) 
तालुका पहिली फेरी दुसरी फेरी 
बागलाण २६ हजार ५५५ ५११ 
चांदवड १४ हजार ५८० ५२६ 
देवळा चार हजार ५५० ५३ 
दिंडोरी २२ हजार २८५ दोन हजार ६२१ 
इगतपुरी दहा हजार ३४ ६२२ 
कळवण पाच हजार ९७७ ६८ 
मालेगाव सहा हजार ४७ दोन हजार २३८ 
नांदगाव १२ हजार ४३६ नऊ हजार १८५ 
नाशिक १९ हजार ६७६ ९९७ 
निफाड २८ हजार ९२४ ६४५ 
पेठ तीन हजार १३१ १६८ 
सिन्नर १९ हजार ४६१ ३१६ 
सुरगाणा दोन हजार ६२२ ६१ 
त्र्यंबकेश्‍वर दोन हजार ५०२ ० 
येवला १२ हजार ५४० ३२८ 
एकूण एक लाख ९१ हजार ३२० १८ हजार ३३९ 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

कुष्ठरोग-क्षयरोग सर्वेक्षण मोहिमेला सुरवात होऊन १५ दिवस चालणाऱ्या मोहिमेत तपासणी केली जाणार आहे. प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती संकलित करून आवश्‍यकतेनुसार उपचाराची दिशा ठरविली जाईल. 
-डॉ. कपिल आहेर (जिल्हा आरोग्याधिकारी)  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two lakh comorbid patients will be reexamined in the district Nashik marathi news