रेल्वे आरक्षण केंद्रावर टू वे माइक सिस्टिम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

रेल्वे आरक्षण कर्मचाऱ्यांना प्रवाशांसोबत संवाद साधण्यासाठी भुसावळ मंडलातील सर्व रेल्वेस्थानकांच्या आरक्षण केंद्रावर "टू वे माइक सिस्टिम'ची सोय करण्यात आली आहे. रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांच्यात सोशल डिस्टन्सिंग पाळून संवादासाठी ही सोय करण्यात आली आहे. 

नाशिक/नाशिक रोड : प्रवासी आरक्षण करण्यासाठी आरक्षण केंद्रावर येतात आणि रांगेत असताना, त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि रेल्वे आरक्षण कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा लागत आहे. यामुळे खूप अडचणी येतात, म्हणून रेल्वे प्रशासनातर्फे सर्व आरक्षण खिडक्‍यांवर टू वे माइक सिस्टिमची सोय केली आहे, जेणेकरून प्रवाशांना नीट संवाद साधता येईल. या माध्यमातून रेल्वे आरक्षण कर्मचारी प्रवाशांचे बोलणे रीतसर समजून घेऊ शकता. आरक्षण खिडक्‍यांबाहेरील बाजूस प्रवाशांचे बोलणे ऐकून घेण्यासाठी स्पीकर लावले आहेत. ते प्रवाशांसाठी सोयीचे आहे. 

प्रवासी- कर्मचाऱ्यांमधील संवादासाठी उपाय 
सुरक्षेच्या दृष्टीने आरक्षण कार्यालयात अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशिन लावली आहे. करन्सी नोटांचा व्यवहार आरक्षण कार्यालयात जास्त प्रमाणात होत असल्यामुळे भुसावळ मंडलामधील सर्व आरक्षण कार्यालयांत सॅनिटायझेशन करन्सी नोट मशिन लावली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरक्षण लिपिक आणि प्रवासी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे मशिन लावण्यात आले आहे. चलनी नोटांची देवाणघेवाण करतानाही त्याचा उपयोग होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two way mic system at railway reservation center