कोरोना संकटात वडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र स्थानिकांसाठी वरदान

 wadala Primary health centers became lifeguards for the locals nashik
wadala Primary health centers became lifeguards for the locals nashik

नाशिक/ इंदिरानगर : कोरोना महामारीत इंदिरानगर-वडाळा शिवारातील महापालिकचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि फीव्हर क्लिनिक सुमारे अडीच लाख लोकांसाठी संजीवनीचे काम करत आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभाग २३ मधील शिवाजीवाडी, भारतनगर या मोठ्या वसाहतीतील हातावर पोट असलेल्यांच्या सोयीसाठी शिवाजीवाडीतील महापालिकेच्या शाळेतील आरोग्य केंद्राचे आता फीव्हर क्लिनिकमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. ६२ हजार ३७ लोक थेट संपर्कात आहेत. महिनाभरातच २६३ रुग्णांची येथे तपासणी करण्यात आली असून, ७५० कोरोनाबाधित रुग्णांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 

वडाळा शिवारातील विनयनगर, साईनाथनगर, दीपालीनगर, खोडेनगर, भाभानगर, रॉयल कॉलनी, इंदिरानगर भागांतील सातशे जनांच्या ॲन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत. डॉ. राजश्री पाटील, पुष्पा दंते, रेणुका गंधारे, प्रियंका कट्यारे, त्रिपिटिका आहिरे आदींचे पथक तपासणी सोबतच समुपदेशनही करीत आहे. तंत्रज्ञ राकेश खोडके पूर्ण दिवस चाचण्या करतात. डीजीपीनगर येथील निरामय ज्येष्ठ नागरिक संघातील फीव्हर क्लिनिकमध्ये आतापर्यंत सात हजार रुग्णांची तपासणी, तर विक्रमी साडेचार हजार जणांच्या रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत. त्यातील ४५० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 
नगरसेवक चंद्रकांत खोडे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, माजी नगरसेवक यशवंत निकुळे आणि वैभव कुलकर्णी यांच्या सहकार्याने पूर्व विभागाचे नोडल अधिकारी डॉ. अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उज्ज्वला लोखंडे, गीता आहिरे, कल्याणी होळकर यांचे पथक इंदिरानगर, द्वारका, वडाळागाव, राजीवनगर वसाहत, शहीद भगतसिंग, सादिकनगर, मेहबूबनगर, मदिना चौक भागातील केंद्रे कष्टकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. 

 
दाट लोकवस्तीमुळे संसर्ग टाळण्यासाठी विशेष काळजी घेताना समुपदेशन करून फीव्हर क्लिनिकमध्ये तपासणीला पाठविले जाते. 
--सुप्रिया खोडे (नगरसेविका ) 

शहरभर सुरू केलेल्या फीव्हर क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांची भीती कमी झाली आहे. संकटावर मात करण्याचा विश्वास यंत्रणेला मिळाला. 
-सतीश कुलकर्णी (महापौर) 

चोवीस रुग्णाच्या संपर्कात संपूर्ण टीम आहे . येणारा प्रत्येक जण येथे पूर्णपणे बरा व्हावा, यादृष्टीने प्रयत्न करत आहोत. 
-संगीता सातपुते (समन्वयिका)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com