प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!

मालेगाव : विविध केक बनवताना सोनाली आहेर.
मालेगाव : विविध केक बनवताना सोनाली आहेर.

नाशिक / मालेगाव कॅम्प : पतीचा रोजगार गेल्यामुळे अडचणींत वाढ होऊनही न डगमगता तिने पतीला खंबिर साथ देत हा व्यवसाय करून घरखर्च भागवला आहे. तंत्रज्ञानाच्या आधाराने गृहिणीची व्यावसायिक झालेल्या तिची ही प्रेरणादायी वाटचाल एकदा वाचाच.. 

तिची पतीला खंबीर साथ

कोरोनाने अनेकांच्या हातचा रोजगार हिरावल्याने जगण्याची पद्धती बदलली आहे. कोठे आयटी इंजिनिअर असलेले मित्र नारळपाणी विकत आहेत तर कोठे नोकरी गेल्याने बेरोजगार झालेले तरूण मास्क, फळे आणि भाजीपाला विक्री करताना दिसत आहेत. अशात लहान हॉटेल व्यावसायिक असलेल्या पतीचा रोजगार गेल्यामुळे अडचणींत वाढ होऊनही न डगमगता तिने पतीला खंबिर साथ देत हा व्यवसाय करून घरखर्च भागवला आहे. तंत्रज्ञानाच्या आधाराने गृहिणीची व्यावसायिक झालेल्या तिची ही प्रेरणादायी वाटचाल .. 

बारावी शिकलेल्या सोनालीने काय केले?

गृहिणी असलेल्या सोनाली आहेर यांच्या पतीचे कॅम्प भागातील शाकंबरी कॉलनीतील यांचे पाच डिव्हीजन रोडवर छोटे हॉटेल होते. ते कोरोनात बंद झाल्याने पती रवी आहेर बेरोजगार झाले. घरात कोंडून घेतल्यागत स्थिती असलेल्या परिस्थितीत उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्‍न या दाम्पत्यापुढे उभा होता. मात्र बारावी शिकलेल्या सोनाली यांनी लोकांची गरज ओळखत घरगुती इव्हेंट संस्कृतीचा फायदा घेतला. केक दुकानांसह बेकरी लॉकडाऊनमध्ये बंदच होत्या. युट्युबच्या मदतीने केक बनवणे शिकत घर खर्चासाठी मार्ग शोधला. नागरिकांनाही मोबाईलद्वारे घरपोच सुविधेमुळे ताजा विविध प्रकारचा "केक' उपलब्ध झाला. 


घरकाम सांभाळून पाचशे रूपये रोज 
लॉकडाऊनमुळे खरंतर कुठल्याही प्रकारचे शिक्षण न घेता स्वावलंबी होण्याची संधी मिळाली. ईच्छा असली की मार्ग सापडतो हा प्रत्यय आल्याचे आहेर यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात दर दिवशी पाच-सहा केक वरुन सध्या ग्राहकांच्या पसंतीने प्रमाण वाढले आहे. ब्लॅक फॉरेस्ट, व्हाईट फॉरेस्ट, पायनापल, स्ट्राबेरी, मॅंगो, जेल केक, चॉकलेट केक अशा विविध प्रकारचे पाव, अर्धा, एक किलो या आकारात कलात्मक केक त्या बनवतात. यामुळे दिवसाकाठी चारशे ते पाचशे रूपये घरकाम सांभाळून मिळत आहेत.

ही संधी नवीन प्रेरणा व बळ देणारी

या छोट्या घरगुती व्यवसायातून घरखर्चाला हातभार लागल्याचा आनंद या गृहिणीच्या चेहऱ्यावर दिसतो. लोकांच्या गरजा ओळखून असे घरगुती व्यवसाय महिलांनी करावेत असे आहेर यांनी सांगितले. तसेच कुठलीही नवीन गोष्ट व्यवसाय म्हणून अवघड वाटते. जीवनात आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. सहज केलेला प्रयत्न माझ्या घरास आधार ठरला. ही संधी कोरोनाच्या परिस्थितीत मला नवीन प्रेरणा व बळ देणारी ठरली. पतींचे पाठबळ यात महत्वपूर्ण ठरल्याचेही त्या सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com