esakal | 'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (11).jpg

डॉक्टर म्हणजे ज्याला आजच्या काळात देवमाणूस बोलले जाते. अशा डॉक्टरकडून कुकर्माचा प्रकार घडला आहे. नेमका प्रकार काय?

'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि.नाशिक) : डॉक्टर म्हणजे ज्याला आजच्या काळात देवमाणूस बोलले जाते. अशा डॉक्टरकडून कुकर्माचा प्रकार घडला आहे. नेमका प्रकार काय?
 

'देवमाणूस' कडूनच कुकर्म

रविवारी (ता. २८) या महिलेस ताप येऊन त्रास होऊ लागला होता. तिने पतीस या त्रासाबाबत सांगितले. पती नित्याच्या कामात व्यस्त असल्याने त्याने पत्नीस मेडिकलमधून गोळी आणण्यास सांगितले. मात्र, पत्नीने गोळी न आणता आराम केला. पती सायंकाळी आल्यानंतर दोघेही दवाखान्यात गेले. मात्र, तो बंद होता. त्याच बिल्डिंगशेजारील डॉक्टरच्या दवाखान्यात गेले. तेथील डॉक्टरने महिलेस तपासण्याच्या बहाण्याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. हा प्रकार त्या महिलेने पतीस सांगितला. त्यानंतर पंचवटी पोलिस ठाणे गाठत त्या डॉक्टरविरोधात फिर्याद दिली. 

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

विनयभंगाचा गुन्हा दाखल

एका महिलेशी पंचवटीतील डॉक्टरने अश्‍लील वर्तन केले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात त्या डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

go to top