यंदा नवरात्रोत्सवात कालिकामातेच्या दर्शनासाठी ऑनलाइन सोय; कोरोनामुळे १०२ वर्षांनंतर यात्रेत खंड

This year Navratra festival will be celebrated in a simple way nashik news
This year Navratra festival will be celebrated in a simple way nashik news

जुने नाशिक :  यंदाच्या नवरात्रोत्सवात भाविकांना कालिकामातेचे ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नवरात्रोत्सवात भाविकांसाठी मंदिर बंद असेल. त्यामुळे दर्शनासाठी मंदिर विश्‍वस्तांतर्फे ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. 

नवरात्रोत्सवातील कालिका यात्रेला अनेक वर्षांची परंपरा असून, येथे मोठी गर्दी असते. यात्रेत अनेक जण वेगवेगळ्या वस्तूंची दुकाने थाटतात. त्यातून त्यांना रोजगारही मिळतो. यंदा मात्र कोरोनामुळे यात्रोत्सवात खंड पडणार आहे. १९१८ मध्येही अशाच प्रकारच्या साथीचा आजार आला होता. त्या वेळीही यात्रा रद्द झाली होती. त्यानंतर म्हणजे तब्बल १०२ वर्षांनंतर २०२० मध्ये यात्रोत्सव रद्द होत आहे. नवरत्रोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आरती, होमहवन, दैनंदिन पूजेसाठी मंदिर उघडे असेल. परंतु भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. पूजेसाठी जेमतेम पाच जणांना परवानगी असेल. पुजारी, सेवक, भाविकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. विश्‍वस्तांकडून ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था कोली जाणार आहे. शिर्डी संस्थानच्या धर्तीवर कालिकामाता मंदिरात बॅंक खाते सुरू करून त्यावर ऑनलाइन दानाची सोय केली जाणार आहे. 

घरबसल्या दर्शन 

कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने कालिका यात्रोत्सव होणार असून, मंदिरात दैनंदिन पूजाविधी, होमहवन सुरू राहणार आहे. भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे, यासाठी फेसबुक, यू-ट्यूब तसेच स्थानिक, धार्मिक वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण तसेच मंदिराबाहेर स्क्रीन बसवून दर्शनाची सोय केली जाणार आहे. - अण्णा पाटील (विश्‍वस्त, कालिका मंदिर देवस्थान) 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com