मोटारसायकलच्या दोन अपघातांत प्रभारी मुख्याध्यापकासह युवक ठार 

संतोष विंचू
Monday, 3 August 2020

शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मोटारसायकलवरून येत असताना महामार्गावर रिलायन्स पेट्रोलपंपाच्या पुढे इंडिका कारची त्यांच्या मोटारसायकला जोराची धडक बसल्याने वाघमोडे गंभीर जखमी होऊन ते जागेवर ठार झाले. 

नाशिक / येवला : रविवारी (ता. २) सायंकाळच्या सुमारास येवला-मनमाड महामार्गावर अनकाई शिवारात झालेल्या अपघातात एका प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. सायगाव फाटा येथे झालेल्या दुसऱ्या अपघातात धामणगाव येथील एका युवकाचा यात मृत्यू झाला. 

भीषण अपघात
कोटमगाव विठ्ठलाचे येथील रहिवासी असलेले व आडगाव चोथवा शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय वाघमोडे (वय ४८, रा. मनमाड) येथून येवल्याकडे मोटारसायकलवरून येत असताना महामार्गावर रिलायन्स पेट्रोलपंपाच्या पुढे इंडिका कारची (एमएच १९, बीजे ५२६६) त्यांच्या मोटारसायकला जोराची धडक बसल्याने वाघमोडे गंभीर जखमी होऊन ते जागेवर ठार झाले. अपघातात त्यांची पत्नी रत्ना वाघमोडे (वय ४६) व पाच वर्षांची नात जखमी झाली. 
सायंकाळी सायगाव फाटा येथे दोन मोटारसायकलींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात धामणगाव येथील चंद्रकांत बाळाजी सोनवणे (वय २५) हा युवक जागीच ठार झाला, तर योगे पगारे गंभीर जखमी झाला. 

 

रिपोर्ट - संतोष विंचू

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man with headmaster were killed in two motorcycle accidents nashik marathi news