#SaathChal तुकाराम गाथा आता ऍपवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

नाशिक - संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांनी रचलेल्या चार हजार 40 ओव्यांची "गाथा' देशात प्रथमच संगीतबद्ध करण्यात आली आहे. ही तुकाराम गाथा भाविकांना ऍपच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे.

नाशिक - संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांनी रचलेल्या चार हजार 40 ओव्यांची "गाथा' देशात प्रथमच संगीतबद्ध करण्यात आली आहे. ही तुकाराम गाथा भाविकांना ऍपच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे.

ऍपवरील तुकाराम गाथाचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. त्यातील ओव्या, अभंग वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक चालीत आहेत. त्यामुळे ते ऐकताना प्रासादिक वाटतात. हे ऍप अँड्रॉइड आणि ऍपलमध्ये डाउनलोड करता येते. हे ऍप सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

संपूर्ण गाथेचे संगीत संयोजन पंडित सुभाष दसककर यांचे आहे. पखवाज, टाळची साथ दिगंबर सोनवणे यांनी, हार्मोनियमची साथ स्वतः दसककर यांनी सिंथेसायझरची साथ ईश्वरी दसककर यांनी केली असून, स्वरसाथ सूरश्री दसककर, गौरी दसककर यांची आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याचे ध्वनिमुद्रण सुरू होते. यात गायक म्हणून ज्ञानेश्वर कासार, आशिष रानडे, विवेक केळकर, अश्विनी भार्गवे, कल्याणी दसककर यांच्या कंठातून या ओव्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तुकाराम गाथेचे समाजातील महत्त्व ओळखून ती सर्व सामान्यांना ऐकता यावी, या उद्देशाने तिचे रेकॉर्डिंग करून देण्यात आले आहे.

Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Tukaram Gatha App